या आंदोलनात महिलांसह युवा मोर्च्याच्या शिवाणी दाणी यांनीही सहभाग घेतला. नवाब मलिक यांनी देशद्रोह केला. त्यामुळं त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अन्यथा हे आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा दाणी यांनी दिलाय.
आमदार कृष्णा खोपडे हेही आंदोलनात सहभागी झाले होते. खोपडे म्हणाले, ठाकरे सरकारचे काही मंत्री जेलमध्ये आहेत. तर काही जेलमध्ये जाण्याच्या मार्गावर आहेत. मलिक यांनी दाऊतसोबत संबंध ठेऊन राज्याची बदनामी केली आहे.
या आंदोलनात शहरातील भाजपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आले होते. मलिक यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
भाजपचे प्रवक्ते गिरीश व्यासही आंदोलनात सहभागी झाले होते. नवाब मलिक यांचे संबंध आतंकवाद्यांशी असल्याचे दिसत आहे. शिवाय मुंबई बाँबस्फोटाच्या आरोपींशी त्यांचे संबंध जोडले गेल्याचा आरोप व्यास यांनी केला.
नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात भाजपने आंदोलन केले. या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी केले.