विधान भवन परिसरात “शाईच्या पेनाला”बंदी; अमोल मिटकरी म्हणतात, पण ‘या’ गोष्टीला खुली परवानगी

| Updated on: Dec 26, 2022 | 12:20 AM

विधानभवन परिसरात सरकारने शाईपेनवर बंदी घातली असली तरी मात्र सिगारेटावर मात्र बंदी घालण्यात आली नाही. त्यामुळे अमोल मिठकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, विधान भवन परिसरात "शाईच्या पेनाला" बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी .

विधान भवन परिसरात शाईच्या पेनालाबंदी; अमोल मिटकरी म्हणतात, पण या गोष्टीला खुली परवानगी
Follow us on

नागपूरः मागील दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोट मिठकरी यांनी आमदार निवासामधील कपबशा टॉयलेटमध्ये धुतनाचा व्हिडीओ ट्विट केला होता. त्यानंतर जोरदार गदारोळ माजला होता. तर आताही अमोल मिठकरी यांनी असाच व्हिडीओ ट्विट केला आहे. तो व्हिडीओ आहे नागपूरमधील विधान भवन परिसरातील. आमदार अमोल मिठकरी यांनी तो व्हिडीओ ट्विट करताना म्हटले आहे की, विधान भवन परिसरात “शाईच्या पेनाला” बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी . विधान भवन परिसरातील आणखी एक पराक्रम. असे म्हणत त्यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला.

 

भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर पुण्यात शाईहल्ला करण्यात आला होता. त्यानंतर हे प्रकरण प्रचंड तापले होते. त्यानंतर काही दिवसातच हिवाळी अधिवेशनाला सुरुवातही झाली. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक झाल्यानंतर नागपूर हिवाळी अधिवेशन चालू असतानाच विधान भवन परिसरात मात्र शाईपेनला बंदी घालण्यात आली.

विधानभवन परिसरात सरकारने शाईपेनवर बंदी घातली असली तरी मात्र सिगारेटावर मात्र बंदी घालण्यात आली नाही. त्यामुळे अमोल मिठकरी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, विधान भवन परिसरात “शाईच्या पेनाला” बंदी मात्र सिगारेट ओढायला खुली परवानगी .

विधान भवन परिसरातील आणखी एक पराक्रम असे म्हणत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे अमोल मिटकरी यांच्या ट्विटवरून आणखी एका वादाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

चंद्रकांत पाटील यांनी बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांचा पुण्यात कार्यक्रम असनाताच त्यांच्या वर एका संघटनेच्या कार्यकर्तेने निषेध व्यक्त करण्यासाठी चंद्रकांत पाटील यांच्या चेहऱ्यावर शाईफेक केली होती.

त्यानंतर हे प्रकरण राज्यात प्रचंड गाजले होते. हे प्रकरण गाजत असतानाच नागपूरला हिवाळी अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधान भवन परिसरात मात्र शाईपेनवर बंदी असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आमदार अमोल मिटकरी यांनी विधानभवन परिसरात शाई पेनवर बंदी घालण्यात आली मात्र सिगारेट मात्र खुली असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.