Nagpur | नागपुरात रात्री 9नंतर दुकानं, हॉटेल्स बंदसह शाळा आणि धार्मिक स्थळांसाठी काय नियम? वाचा सविस्तर

| Updated on: Dec 25, 2021 | 7:14 PM

नागपुरात दुकाने, सिनेमागृह, रेस्टोरेंट, उपाहारगृह, रात्री 9 पर्यंत राहणार सुरू राहणार आहेत, तर रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी असणार आहे.

Nagpur | नागपुरात रात्री 9नंतर दुकानं, हॉटेल्स बंदसह शाळा आणि धार्मिक स्थळांसाठी काय नियम? वाचा सविस्तर
CORONA AND CURFEW
Follow us on

नागपूर : ओमिक्रॉनच्या धास्तीने राज्यात सैल झालेले निर्बंध पुन्हा कडक होत आहेत. राज्य सरकारने कालच नवी नियमावली जाहीर केली आहे, मुंबई, पुणे नागपूरसारख्या मोठ्या शहरांच्या जिल्हा प्रशासनाने आणि महानगरपालिकांनी आपली नियमावली जाहीर केली आहे. त्यात नागपुरात दुकाने, सिनेमागृह, रेस्टोरेंट, उपाहारगृह, रात्री 9 पर्यंत राहणार सुरू राहणार आहेत, तर रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी असणार आहे.

नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढले नवे आदेश

नागपूरच्या जिल्हाधिकारी आर. विमला यांनी आजपासून जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू केले. त्यात त्यांनी दुकाने, सिनेमागृहे, हॉटेल्सच्या वेळाही दिल्या आहेत. रात्री 9 नंतर दुकाने, सिनेमागृहे, हॉटेल्स सुरू ठेवता येणार नाही, नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचेही निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. क्रिडा स्पर्धा, विवाह, कार्यक्रम, सोहळे, अंत्यविधी, कृषी ,शेती, धार्मिक स्थळे, कोचिंग क्लासेस, शाळा, ग्रंथालय, व्यायामशाळा, सलून, ब्युटी पार्लर, महाविद्यालय, यासंदर्भात आजपासून लागू असणारे निर्बंध स्पष्ट करण्यात आले आहेत.

ओमिक्रॉनचा फैलाव वाढल्याने राज्यात निर्बंध

हॉटेल, पब, बारमध्ये अनेक कार्यक्रमात लोकांची गर्दी होते, हीच गर्दी टाळण्यासाठी रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. रात्री 9 ते सकाळी 6 या वेळेत 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येता येणार नाही, लोक नियम मोडताना दिसून आले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. तसेच लग्न समारंभालाही काही लोकांची मर्यादा घालून देण्यात आली आहे. तिसरी लाट आली तर पुन्हा लॉकडाऊन लागेल असा सूचक इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला आहे. त्यामुळे प्रशासन यंत्रणाही अलर्ट मोडवर आली आहे, त्यामुळे रुग्ण वाढू द्याचे नसतील आणि हे निर्बंध आणखी कठिण होऊ द्याचे नसतील तर नियमांचे काटेकोर पोलन करा असे आवाहन प्रशानाकडून करण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यात नवी नियमावली लागू, काय असतील नवे निर्बंध? वाचा सविस्तर

लसीचे दोन डोस घ्या, नाही तर कारवाई करू; केडीएमसीचा दुकानदार, व्यापाऱ्यांना ‘डोस’

तब्बल 400 एटीएमचा डाटा चोरून लाखोंचा गंडा, पोलिसांनी टोळीच्या मुसक्या आवळल्या