नागपूर, दिनांक 16 जुलै 2023 : गॉड आणि गव्हर्नमेंट या दोघांवर आपला विश्वास असतो. सरकारचा हस्तक्षेप, सरकारचा सहभाग आणि सरकारची सावली जरी ज्या प्रकल्पावर पडते, तो प्रकल्प नष्ट होतो, या थिअरीवर माझा विश्वास आहे. सरकार म्हणजे विषकन्येसारखं असतं. त्यामुळे सरकारपासून जो दूर राहील तोच प्रगती करू शकतो, असं मोठं आणि धक्कादायक विधान केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. सरकारमधील अडचणी ज्या आहेत, त्या वेगळ्या आहेत. आता मांडलेल्या अनेक गोष्टी कटू सत्य आहेत, असंही नितीन गडकरी म्हणाले.
नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी यांनी हे धक्कादायक विधान केलं. देशाचं कृषी उत्पन्न 22 टक्क्यावर नेण्याचं आज आपल्यासमोर सगळ्यात मोठे टार्गेट आहे. आणि हे ज्या दिवशी नेऊ, त्या दिवशी शेतकऱ्यांचे मजुरी 1500 रुपये होईल. याचं सगळ्यात मोठा कारण असं आहे की, हे करण्याकरता काही ग्रास रूट रियालिटी आहेत. माझं हे मत आजही नाही, मी विरोधी पक्षात होतो तेव्हाही माझं हेच मत होतं. आजही आहे. त्या बाबतीत मी नेहमी म्हणतो की, गॉड आणि गव्हर्मेंट या दोघांवर आपल्या सगळ्यांचा विश्वास असतो. त्यामुळे मी पहिल्यांदा या थेरीचा समर्थक आहे, असं गडकरी म्हणाले.
यावर्षी एमएसपी जी दिली त्यामध्ये अडचणी आहेत. मार्केट प्राईज आणि एमएसपी यामध्ये मार्केट प्राइस कमी आणि एमएसपी जास्त आहे. त्याचा बॅलन्स करण्याकरता दीड लाख कोटी द्यावे लागले. जे घेतलेल अन्न आहे ते ठेवायला, स्टोरेज करायला गोडाऊन बरोबर नाही. त्यातून किती सडलं? काय झालं? ते परमेश्वराला माहिती, असंही ते म्हणाले. मी काही त्यावर बोलत नाही. मी मंत्री असल्यामुळे मलाही बोलण्याच्या मर्यादा आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सरकारने काय केले पाहिजे, यावर शरद जोशींनी पॅटर्न ठरवला पाहिजे, हा पर्याय दिला आहे, असंही त्यांनी सांगितलं.
Addressing Dr. C D Mayee Krishi Puraskar program organised by Krushi Vikas Pratishthan, Nagpur https://t.co/ip6xtRiHyR
— Nitin Gadkari (@nitin_gadkari) July 15, 2023
जोपर्यंत एका एकरात 20 क्विंटल कापूस होत नाही, जोपर्यंत एका एकरात कमीत कमी 15 क्विंटल सोयाबीन होत नाही, आणि कमीत कमी एका एकरात 30 टन संत्रा होत नाही. तोपर्यंत काही होणार नाही. त्यामुळेच उत्पादन वाढवलं पाहिजे. तरच शेतकऱ्यांना स्थिरता येईल, असंही त्यांनी सांगितलं. कोणत्याही देशातील बाजारात मागणी आणि पुरवठ्यावरच भाव आधारीत असतो, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
दुधाचा धंदा चांगला झाला तर त्याला गायी पाहिजे. पण आपल्याकडे गायी चांगल्या नाही. पुढल्या पाच वर्षात आपल्याला 25 लिटर दूध देणाऱ्या 25 हजार गायी तयार करायच्या आहेत. गायींसाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तयार करण्यात येणार आहोत. तंत्राचा वापर करून दूधाचं उत्पादन वाढवलं तर शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल. त्याबाबतचं व्हिजन तयार केलं पाहिजे, असंही त्यांनी म्हटलंय.