Nagpur Jobs | घरबसल्या शोधा रोजगार! बेरोजगारांसाठी ऑनलाईन मेळावा आजपासून

| Updated on: Dec 12, 2021 | 10:52 AM

औद्योगिक आस्थापनांनी सुध्दा www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊन या मेळाव्यात मनुष्यबळ मागणीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.

Nagpur Jobs | घरबसल्या शोधा रोजगार! बेरोजगारांसाठी ऑनलाईन मेळावा आजपासून
jobs
Follow us on

नागपूर : कुशल व अकुशल कामगारांसाठी कौशल्य, रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या वतीने 12 ते 17 डिसेंबरदरम्यान पंडित दिनदयाल उपाध्याय राज्यस्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. गरजू बेरोजगार उमेदवारांनी विभागाच्या संकेतस्थळावर तत्काळ नोंदणी करावी. मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. गं. हरडे यांनी केले आहे.

 

कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळं जिल्ह्यातून अनेक मजूर, कामगार वर्ग औद्योगिक आस्थापनेवरून स्वगावी स्थानांतरित झालेत. औद्योगिक आस्थापनामध्ये कुशल व अकुशल मनुष्यबळाचा तुटवडा निर्माण झाला. या कामगारांच्या स्थानांतरामुळं अनेक औद्योगिक आस्थापनेवर सद्यस्थितीत रोजगाराची संधी निर्माण झाली आहे.

विविध प्रकारची पदभरती

या मेळाव्यात गंवडी, सुतारकाम, फिटर, बार वेडिंग व फिक्सिंग करणारे, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, वायरमन, सीएनसी ऑपरेटर, मशिनिस्ट, अकुशल कामगार, आरोग्य, पॅरामेडिकल, मॉल्स, आटोमोबाईल, बँकिंग, हॉटेलिंग, ट्रान्सपोर्टिंग, ट्रॅव्हल अँड टुरिझम क्षेत्रातील स्टाफ आदी विविध प्रकारची पदे भरावयाची आहे. दहावी, बारावी आय.टी.आय. पॉलिटेक्नीक उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन विभागाद्वारे करण्यात आले आहे.

 

नोंदणीसाठी साधा संपर्क

औद्योगिक आस्थापनांनी सुध्दा www.rojgar.mahaswayam.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने सहभागी होऊन या मेळाव्यात मनुष्यबळ मागणीसाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यास अडचणी आल्यास किंवा अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 0712-2531213 या दुरध्वनी क्रमांकावर ज्योती वासुरकर, मार्गदर्शन अधिकारी मनीष कुदळे, जिल्हा समन्वयक योगेश कुटे यांच्याशी संपर्क साधावा.

 

Nagpur ZP | आम्हाला गणवेश केव्हा मिळेल? विद्यार्थी विचारतात झेडपीला प्रश्न

Clean Nagpur | घरीच करा कचऱ्याची विल्हेवाट, अन्यथा 15 पासून कचरा उचलणार नाही?

Love breakup | प्रेयसीशी जबरदस्तीचा प्रयत्न; नकार देताच गळफास लावला पण…