Nagpur Board | दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी, पॉझिटीव्ह असाल तरीही देता येणार परीक्षा पण कशी, वाचा…

| Updated on: Feb 12, 2022 | 10:42 AM

दहावी, बारावीच्या परीक्षेची तयारी सुरू आहे. पॅाझिटिव्ह विद्यार्थी पीपीई कीट घालून परीक्षा देणार आहेत, अशी माहिती नागपूर बोर्डाचे अध्यक्ष चिंतामन वंजारी यांनी दिली.

Nagpur Board | दहावी, बारावीच्या परीक्षांची तयारी, पॉझिटीव्ह असाल तरीही देता येणार परीक्षा पण कशी, वाचा...
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

नागपूर : चार मार्चपासून बारावी, तर 14 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होणार आहे. लसीकरण झालं नाही तरी परीक्षा देता येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या सावटात दहावी आणि बारावीची ॲाफलाईन परीक्षा होणार आहे. नागपूर विभागातील परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. कोरोनाबाधित (positive) विद्यार्थ्यांना पीपीई कीट (giving PPE kits to students) घालून, स्वतंत्र रुममध्ये परीक्षा देता येणार आहे. शिवाय लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांनाही दहावी आणि बारावीची परीक्षा देता येणार, अशी माहिती नागपूर विभागीय बोर्डाचे अध्यक्ष चिंतामण वंजारी (Board Chairman Chintaman Vanjari) यांनी दिलीय. त्यामुळं कोणत्याही विद्यार्थ्याने घाबरून जाण्याचे कारण नाही. बोर्डानं सर्व विद्यार्थ्यांची व्यवस्था केलेली आहे. मुख्याध्यापकांच्या बैठका घेण्यात येत आहेत. त्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे.

बारावीचे 1536 परीक्षा केंद्र

नागपूर विभागात बारावीचे 1536 परीक्षा केंद्र असून, एक लाख 62 हजार 519 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. त्यासोबतच 2496 परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा घेण्यात येणार आहे. 1 लाख 57 हजार 32 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. वेतनेत्तर अनुदानाचे 60 कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळं संस्थाचालक आपली शाळा परीक्षा केंद्राला देणार, अशी माहिती वंजारी यांनी दिलीय. विद्यार्थ्यांना काही समस्या आल्यास हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. शिवाय जिल्हास्तरावर समुपदेशक नियुक्त केलेले आहेत. त्यांना फोन करून माहिती घेता येईल.

मुख्याध्यापकांच्या ऑनलाईन सभा

दहावी, बारावीचे प्रात्याक्षिक परीक्षांचे साहित्य शाळांपर्यंत पोहचंलेलं आहे. बारावीच्या प्रश्नपत्रिका शाळांपर्यंत पोहचविण्याचं काम एक मार्चपासून सुरू होणारा आहे. त्यापूर्वी उत्तर पत्रिका शाळांपर्यंत पोहचणार आहेत. शाळा तिथं केंद्र राहणार आहे. यासंदर्भात शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक यांच्या सभा घेतल्या आहेत. उपसंचालकसुद्धा या सभेला होते. राज्याचे अध्यक्ष गोसावी यांनी त्यांना मार्गदर्शन केले आहे. परीक्षा कशी सुरक्षित पार पाडता येईल, याची इतंभूत माहिती दिली आहे. शिवाय सर्व मुख्याध्यापकांच्या ऑनलाईन सभा आयोजित केल्या आहेत. परीक्षा कशी घ्यायची. वातावरण कसं ठेवायचं, यासंदर्भात आणखी सभा घेऊन मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Nagpur Z p | नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आता गुणवत्ता चाचणी, गुरुजी कसे जाणार सामोरे?

गोंदिया जिल्ह्यातील तीन नगरपंचायतींसाठी सहा उमेदवारी अर्ज, नगराध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार?

Video – नागपूर सीमेलगतच्या गावात शिरले अस्वल; रात्रीच्या अंधारात शिकारीचा बेत?, वनविभागाची शोधमोहीम