बाबा आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1914 रोजी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे झाला. वडील देविदास मोठे सावकर होते. आईचे नाव लक्ष्मीबाई. मुरलीधर यांचे टोपणनाव बाबा ठेवले गेले. वर्धा येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. सेवाग्रामला आलेल्या महात्मा गांधींना भेटले. त्यानंतर बाबांनी स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग नोंदविला. गांधीजींच्या चरख्याचा त्यांनी स्वीकार केला. खादीचेच कपडे घालत असत.
तेव्हा कुष्ठरोग्यांबद्दल अपसमज पसरले होते. त्यांना सामाजिक स्थान मिळविण्यासाठी बाबांनी पुढाकार घेतला. 15 ऑगस्ट 1949 रोजी महारोगी सेना समितीची स्थापना केली. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन वरोरा येथे आहे. त्यांना नंदनवन असं नाव दिलं. 1952 साली कुष्ठरोग्यांसाठी आश्रमाची स्थापना केली. तिथंच कुष्ठरोग्यांची रोजगाराची व्यवस्था केली. अंध, अपंग, लाचार, कर्णबधिर या सगळ्यांना जीवनाचा खरा अर्थ समजावून सांगितला. कुष्ठरोग्यांना मानसिक आधार दिला. शेतीचे प्रशिक्षण दिले. दुग्धशाळा, गोशाळा, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन आणि कुटीर उद्योगाला लावले. कुष्ठरोग्यांना नवा आशेचा किरण दाखविला. पाप केल्यानं कुष्ठरोग होतो. अशी समज त्यावेळी होती. ती बाबा आमटे यांनी दूर केली. 2008 मध्ये आनंदवन 176 हेक्टर्सपर्यंत विस्तारले गेले. आनंदवनात साडेतीन हजार कुष्ठरोग्यांवर उपचार केले गेले.
1973 साली गडचिरोलीत मादिया गोंड जमातीच्या आदिवासींना संघटित केले. तसेच हेमलकसा येथे लोकबिदारीची स्थापना केली. डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदाकिनी आमटे यांनी हा प्रकल्प समर्थपणे 25 वर्षे सांभाळला. आता तिसरी पिढी या प्रकल्पाचा वारसा पुढे नेत आहेत. या प्रकल्पाअंतर्गत आश्रमशाळा व दवाखानाही सुरू करण्यात आला.
सामाजिक एकता आणि समता प्रस्तापित करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. वन्यप्राण्यांच्या शिकार तस्करीपासून आदिवासींना दूर केले. बाबांनी नर्मदा बचाव आंदोलनातही सहभाग घेतला. बाबांना दोन मुले आहेत. डॉ. विकास आमटे व डॉ. प्रकाश आमटे. शिवाय दोन्ही सुना डॉ. मंदाकिनी आणि डॉ. भारती यांनीही सामाजिक कार्यात वाहून घेतले. मी एक महान नेता बनण्यासाठी काम करत नाही. तर मी गरजू गरिबांना मदत करू इच्छितो, असं बाबा म्हणायचे. 9 फेब्रुवारी 2008 साली त्यांचा मृत्यू झाला. पत्नी साधना यांनीही त्यांना साथ दिली.
बाबा आमटेंना मिळालेले महत्त्वाचे पुरस्कार
1971 – पद्मश्री पुरस्कार
1985 – रमण मॅगसेसे पुरस्कार
1986 – पद्म विभूषण
1979 – जमनालाल बजाज अवॉर्ड
1985 – इंदिरा गांधी मेमोरियल अवॉर्ड
1991 – आदिवासी सेवक अवॉर्ड
2004 – महाराष्ट्र भूषण अवॉर्ड