नागपूर : भिवापूर तालुक्यातील कोलारी येथील शेतकरी भालचंद्र धनविजे शेतावर जात होते. पंढरी वैरागडे यांच्या शेताजवळून नाला वाहतो. या नाल्याच्या काठावर त्यांना मानवी कवटी (Kavathi in Nala near Kolari) दिसली. त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. ठाणेदार महेश भोरटेकर, सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश चंगोले, गणेश भुरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनाम्यानंतर कवटी ताब्यात घेण्यात आळी. कवठी फॉरेन्सिक चाचणीकरिता ( Forensic Test) नागपूरला पाठविण्यात आली. चार-पाच दिवसांपूर्वी चाय परिसरात महिलेची साडी ((Women’s Saree) ) व पेटीकोट आढळला होता. या कपड्यांच्या बाजूला जनावराचे मुंडके व हाडं पडलेली होती.
कोलारी येथील प्रमिला मारोती धनविजे ही विधवा महिला गेल्या पाच महिन्यांपासून बेपत्ता आहे. तिचा भाऊ रवींद्र शेंडे याने यासंदर्भात भिवापूर पोलिसांत तक्रार दिली. तेव्हापासून पोलीस प्रमिलाचा शोध घेत आहेत. या महिलेला दोन मुली आहेत. एक सहाव्या, तर दुसरी नवव्या वर्गात शिक्षण घेत आहेत. त्यामुळं ही कवठी याच महिलेची असावी, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या बत्तीस वर्षीय महिलेचे एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. ती त्याच्यासोबत लग्नही करणार होती. पण, अचानक बेपत्ता झाली. त्यामुळं या महिलेची कुणीतही हत्या केली असावी, अशीही शंका व्यक्त केली जात आहे. कदाचित तिने आत्महत्या केली असावी, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार महेश भोरटेकर, सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.