नागपूर: अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) आणि आमदार रवी राणा (ravi rana) हे मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी मुंबईत आले आहेत. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी जोरदार टीका केली आहे. हिंदुत्व, राम नवमी, हनुमान चालिसा हे श्रद्धेचे विषय आहेत. ते मार्केटिंगचे विषय नाहीत. बंटी और बबली आले असतील तर आम्हाला काही हरकत नाही. मार्केटिंग करणं हे त्यांच्ं काम आहे. भाजपला मार्किटिंगसाठी असे सी ग्रेड स्टार लागतात, असं संजय राऊत म्हणाले. हिंदुत्वाची मार्केटिंग करण्याची गरज नाही. श्रद्धा भावनेची बात आहे. मुंबईत असं वातावरण असतं. आता कळेल, असा इशाराही राऊत यांनी दिला. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा इशारा दिला.
कुणाला स्टंटच करायचा असेल तर ते सिनेमातील लोकं आहेत. त्यांना स्टंटचा अनुभव आहे. स्टंट करू द्या. या स्टंटने फरक पडत नाही. त्यांना शिवसेनेचं मुंबईतलं पाणी माहीत नाही, करू द्या त्यांना स्टंट. आमचे शिवसैनिक सक्षम आहे. हनुमान चालिसा वाचणं. रामनवमी साजरी करणं हे श्रद्धेचे विषय आहेत. हे नौटंकी आणि स्टंटचे विषय नाहीत. अलिकडे भाजपने नौटंकी केली आहे. त्या स्टंटमधील पात्र आहेत. लोकं यांना सीरियसली घेत नाहीत. आम्ही सर्व सण साजरे करतो. यांचा हिंदुत्वाला संबंध नव्हता तेव्हापासून आम्ही उत्सव साजरा करतोय. शोभायात्रा काढतोय. हे काय आम्हाला शिकवतात यांना स्टंट करू द्या, असं संजय राऊत म्हणाले.
राणा दाम्पत्य गुंगारा देऊन मातोश्रीवर येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. असं काही नसतं. कसले गुंगारे वगैरे. मुंबईची पोलीस शिवसैनिक सक्षम आहे. स्टटं करणाऱ्यांना कारण लागत नाही. राम नवमी, हिंदुत्व स्टंटचे विषय आहे का? सीग्रेड फिल्मस्टार स्टंट बाजचा उपयोग करून घेतात मार्केटींगसाठी असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
Ajit Pawar: तर मी तुमच्याशी बोलायचंच बंद करेन, अजितदादा को गुस्सा क्यों आता है
Maharashtra News Live Update : रवी राणा नवनीत राणा मुंबईत दाखल, पोलिसांकडून दाम्पत्याचा शोध