गायी-बकऱ्यांची अशीही चोरी, चोरट्यांची नक्कल पाहून पोलीसही हैराण, घटना सीसीटीव्हीत कैद

| Updated on: May 08, 2023 | 12:14 PM

ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. आता आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण, समोर झालेला प्रकार पाहून पोलिसांनाही धक्काच बसला.

गायी-बकऱ्यांची अशीही चोरी, चोरट्यांची नक्कल पाहून पोलीसही हैराण, घटना सीसीटीव्हीत कैद
Follow us on

सुनील ढगे, प्रतिनिधी, नागपूर : गायींची तस्करी होताना दिसून येते. खाटकाकडून या गायी घेतल्या जातात. कसाईखाण्यात नेल्या जातात, असे काही प्रकार उघडकीस येतात. गायींना कोंडून त्यांची वाहतूक केली जाते. पण, नागपुरात आता एक वेगळ्याचं गायींच्या चोरीचा प्रकार समोर आला. गायी नेण्यासाठी ट्रकचा किंवा टेम्पोचा वापर करण्यात आला नाही. गायींना दावणीला बांधूनही नेण्यात आलं नाही. पण, गायींच्या वासरांची चोरी होती. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली. या माध्यमातून पोलिसांनी आरोपींचा शोध लावला. आता आरोपींना अटक करण्यात आली आहे. पण, समोर झालेला प्रकार पाहून पोलिसांनाही धक्काच बसला.

गायी चोरण्यासाठी कारचा वापर

नागपूरच्या पाचपावली पोलिसांनी गायीच्या वासरांना चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. यातील एकाला अटक करण्यात आली आहे. तो कुख्यात गुन्हेगार आहे तर दुसरा फरार आहे. दोन गायी चोरल्याची त्याने कबुली दिली. महत्त्वाचं म्हणजे गायी चोरीसाठी ते कारचा उपयोग करत होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली.

हे सुद्धा वाचा


वारसाला टाकले गाडीत

पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गाय मालकाची गाय चोरीला गेली. त्याचा तपास पोलीस करत असताना आजूबाजूला असलेले सीसीटीव्हीचे तपासले. एका कारमध्ये दोन जण बसलेले दिसले. त्यांनी आधी बाहेर उतरून इकडे तिकडे कोणी नाही हे बघितलं. गायीजवळ बसून असलेल्या गायीच्या वासराला आपल्या कारमध्ये टाकून त्या ठिकाणावरून ते रफूचक्कर झाले.

आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारचा शोध घेतला. या आरोपींच्या मुसक्या अवळण्यात पोलिसांनी यश मिळवलं. यातील आरोपी शहाबाद हा खुंखार असून त्याच्यावरती 302 चा गुन्हा दाखल आहे. आरोपींनी दोन ठिकाणावरून अशाप्रकारे गायी चोरल्याचा कबुली दिली. अशी माहिती पाचपावलीचे पोलीस उपनिरीक्षक व्ही. ए. मनपीया यांनी दिली.

गायी-बकऱ्या चोरणारी गँग सक्रिय?

काही दिवसांपूर्वी नागपुरात एक बकरी चोर गँग अशाच प्रकारे पकडल्या गेली होती. आता गायी चोरण्याचा हा प्रकार पुढे आला. गायी-बकऱ्या चोरण्यासाठी अशाप्रकारे कुठली गँग सक्रिय झाली आहे का, याचासुद्धा शोध पोलीस घेत आहेत.