Irrigation | पाणी अडवा, पाणी जिरवा! नागपूर जिल्ह्यात लक्ष्य 500 वनराई बंधाऱ्यांचे; 379 बंधार्‍यांचे काम पूर्ण

| Updated on: Dec 23, 2021 | 2:11 PM

लोकसहभागातून 500 वनराई बंधारे बांधण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. त्यापैकी 379 बंधारे बांधून पूर्ण झालेत. यातून पाण्याची पातळी वाढली असून बंधाऱ्या शेजारील शेतीला फायदा होत आहे.

Irrigation | पाणी अडवा, पाणी जिरवा! नागपूर जिल्ह्यात लक्ष्य 500 वनराई बंधाऱ्यांचे; 379 बंधार्‍यांचे काम पूर्ण
संग्रहित फोटो
Follow us on

नागपूर : उन्हाळ्यात पाण्याची प्रचंड कमतरता. पावसाळ्यात पाणी वाहून जाते. बेसुमार उपसा नि सिंचनाच्या अभावामुळं हे सार सुरू होतं. यावर उपाय म्हणून कृषी विभागाच्या पुढाकारातून वनराई बंधारे बांधण्याचे निश्चित करण्यात आले. लोकसहभागातून 500 वनराई बंधारे बांधण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलंय. त्यापैकी 379 बंधारे बांधून पूर्ण झालेत. यातून पाण्याची पातळी वाढली असून बंधाऱ्या शेजारील शेतीला फायदा होत आहे.

भूजल पातळीत वाढ

सिमेंटची रिकामी पोती, माती, वाळू यांचा वापर करून वनराई बंधारे बांधले जातात. या बंधाऱ्यातून रबी शेतीला पाणी मिळतो. शिवाय पाणी जमिनीत मुरल्यानं भूजल पातळीत वाढ होते. विहीर तसेच बोअरवेल यांची पाणी पातळी या माध्यमातून वाढते. जनावरांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत असल्याचं जिल्हा कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी सांगितलं.

नागपुरात सर्वाधिक 47 बंधारे

कृषी विभागानं 2021-22 साठी जिल्ह्यात 500 वनराई बंधारे बांधण्याचे लक्ष्य ठेवलंय. श्रमदानातून नागरिकांचा सहभाग मिळत आहे. आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत जिल्ह्यात 379 बंधार्‍यांचे काम पूर्ण झाले आहे. सावनेर – 37 बंधारे, हिंगण्यात – 23, कामठीत – 20, कळमेश्‍वरमध्ये – 22, उमरेडमध्ये – 55, पारशिवनी – 21, काटोल – 31, नरखेड – 23, नागपुरात – 47, भिवापूरमध्ये -25, कुहीमध्ये – 26, रामटेक -27 व मौदा तालुक्यात 22 असे वनराई बंधारे बांधण्यात आले.

संरक्षित सिंचनासाठी वापर

वन्यप्राण्यांना पाणी टंचाईचे दाहक चटके बसत असतात. अवेळी पडणार्‍या पावसाचे पाणी नाला किंवा ओढ्यातून वाहून जाते. भूजल पातळीही खालावत चालल्याने अशात रब्बी हंगामातील पिकांना उपयुक्त पाणी मिळत नाही. त्यामुळे पाणी अडवा, पाणी जिरवा, या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यात कृषी विभागाच्या पुढाकारानं श्रमदानातून वनराई बंधार्‍यांची निर्मिती होतेय. शेतकर्‍यांच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांसाठी संरक्षित सिंचनासाठीही या पाण्याचा वापर होत आहे.

Nagpur Crime | अनैतिक संबंधाचा संशय, खून करून अपघाताचा बनाव; 14 वर्षांनंतर उकलले गूढ

Video – Nagpur | रिलायन्सच्या गोदामाला आग, कोट्यवधींचे नुकसान; आगीचे कारण काय?

Gadchiroli | हत्तींची विदर्भात दस्तक! शेतकऱ्यांचे नुकसान; हत्तींनी स्वीकारला अधिवास