नागपूर : कुकडे ले-आउट येथील नितीन मेश्राम (वय 48) हा चार आरोपी महिलांना आपल्या कारने ने-आण करीत होता. तो शहरातील वेगवेगळ्या बस स्थानकांवर या महिलांना उतरवायचा. त्या बसमध्ये चढल्या की, आपले काम करायच्या. महिलांचे दागिने, पर्स (Women’s Jewelry, Purses) लंपास करायच्या. त्यानंतर दागिने घेऊन बसस्थानकावर उतरायच्या. नितीन लगेच कारने जायचा आणि त्यांना परत घेऊन जायचा. शिवाय चोरी केल्यानंतर चोरीचा माल विकण्याची जबाबदारीही नितीनकडे होते. या महिला स्कार्प घालत असल्यानं त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नव्हते. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शोधल्यानंतर बेलतरोडी पोलिसांना (Beltarodi Police) खबऱ्यांची मदत घ्यावी लागली. त्यानंतर आरोपींपैकी कुंठीलालपेठ येथील रहिवासी ललिता बलवीर (वय 50) हिला अटक करण्यात आली. आणखी तीन महिला आरोपी पसार (Three Women Accused Passed) आहेत. त्यांचा शोध आता पोलीस घेत आहेत. ललिताकडून 75 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आलेत.
शहरात गेल्या काही दिवसांपासून बसमधून महिलांचे दागिने, पर्स चोरी जात होते. 21 जानेवारीला वणी येथील ज्योत्सना जीवन लोंडे यांचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र बसमधून गहाळ झाले. त्या वर्धा मार्गावरील चिंचभवन येथून यवतमाळला जाण्यासाठी बसमध्ये बसल्या होत्या. डोंगरगावपूर्वीच चार महिलांनी ज्योत्सनाच्या बॅगमधील मंगळसूत्र लंपास केले होते. ज्योत्सनाच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला. पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची फुटेज तपासण्यात आले. आरोपी महिलांनी स्कार्फ बांधल्याने त्यांना ओळखणे कठीण होते. पण, खबऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी त्यांचा शोध लावला. ललिताला अटक करण्यात आली असून, इतर तिघींचा शोध आता पोलीस घेत आहेत. एक व्यक्ती चार महिलांना वेगवेगळ्या बसस्थानकावर उतरवायचा. त्यानंतर त्या महिला स्कार्फ बांधून राहायच्या. बसमध्ये दागिने लंपास करायच्या. अशा टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. एक महिला आणि एका पुरुष आरोपीला अटक केली.