नागपूर-शिर्डी Express Highwayचा पहिला टप्पा मेमध्ये सुरू होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती

| Updated on: Mar 23, 2022 | 4:35 PM

राज्यातील महत्तवाकांशी एक्सप्रेस हायवे मुंबई-नागपूर असा जोडला जात आहे. याच्या पहिल्या टप्प्याचे काम बहुतेक पूर्ण झाले आहे. एक्सप्रेस हायवेटा नागपूर ते शिर्डी असा पहिला टप्पा मेपासून सुरू करणार असल्याची माहिती नागरी विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

नागपूर-शिर्डी Express Highwayचा पहिला टप्पा मेमध्ये सुरू होणार, एकनाथ शिंदे यांची माहिती
नागपूर-मुंबई एक्सप्रेस हायवेचे छायाचित्र.
Image Credit source: tv 9
Follow us on

नागपूर : मुंबई-नागपूर एक्सप्रेस हायवेचा (Mumbai-Nagpur Express Highway) पहिला टप्पा मे महिन्यापासून सुरू करण्याचा राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. राज्याचे नागरी विकास मंत्री एकनाथ शिंदे (Urban Development Minister Eknath Shinde) यांनी मंगळवारी ही माहिती दिली. पहिल्या टप्प्यात नागपूर ते शिर्डी (जि. अहमदनगर) असा एक्सप्रेस हायवे सुरू होणार आहे. शिंदे म्हणाले की, एक्सप्रेस हायवेचा विस्तार सरकारला करायचा आहे. मुंबई ते नागपूर या रस्त्याने जोडण्यात येणार आहे. त्यापुढं हा एक्सप्रेस हायवे गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यापर्यंत नेला जाणार आहे. गडचिरोलीपर्यंतचा हा विस्तार महत्वाकांशी राहणार आहे. तेलंगणा, आंध्रप्रदेश आणि छत्तीसगडपर्यंत या एक्सप्रेस हायवे जोडला जाणार आहे. मुंबई ते नागपूर हा एक्सप्रेस हायवे वर्षभरात पूर्ण होणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्याच्या कामाला वेग

नागपूर ते शिर्डी हे 520 किलोमीटर अंतराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून या कामाला वेग मिळाला आहे. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाच्या कामाला 2018 मध्ये प्रत्यक्ष सुरुवात झाली. 2020 मध्येच नागपूर ते शिर्डी हा रस्ता सुरू झाला असता. परंतु, कोरोनामुळे काम मंदावला होता. दहा जिल्हा 390 गावांना जोडणारा असा हा एक्सप्रेस हायवे आहे. या महामार्गामुळं मुंबई ते नागपूरचे अंतर केवळ आठ तासात पूर्ण करता येणार आहे. नागपूर ते इगतपुरी हा दुसरा टप्पा राहणार आहे. तर मुंबई ते नागपूर हा कामाचा तिसरा टप्पा राहणार आहे. त्यानंतर या रस्त्याचा विस्तार गडचिरोलीपर्यंत केला जाणार आहे.