गजानन उमाटे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : नागपूर येथील मिनकॉमच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले, मला समाधान आहे की सर्वोच्च न्यायालयाने साईबाबा संदर्भातील दिलेला निकाल योग्य आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. नागपूर कोर्टाने दिलेला निकाल आमच्यासाठी धक्कादायक होता. आम्ही आता पुढे कायदेशीर लढाई लढू. ज्या पोलिसांची नक्षलवाद्यांनी हत्या केली त्यांच्या कुटुंबाला हा एकाप्रकारे न्याय मिळाला आहे. आमच्या सरकारमध्ये कोणतीही आस्थिरता नाही. आमचे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल. आणि पुन्हा सत्तेत येऊ असा टोला अजित पवार यांना लगावला.
मिनकॉमच्या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ही अत्यंत खुशीची गोष्टी की, मीनकॉनचं आयोजन नागपुरात तीन वर्षानंतर करण्यात आलं. सरकारी विभागांनी मिळून मिनकॉनच्या माध्यमातून मायनिंग इंडट्रीच्या संधी दाखविल्या जाव्यात.
मायनिंगमधील नवीन तंत्रज्ञान सर्वांसमोर दाखवावं. तसेच या इंडस्ट्रीतील आव्हानं सरकारच्या लक्षात आणून द्यावं. अशा बहुउद्देशानं याचं आयोजन करण्यात आलं. प्रदर्शनी बघीतली. ड्रोन व कृत्रीम तंत्रज्ञान येथे दिसून येते. मायनिंग वीथ सस्टेनेबिलीटी या उद्देशाला समोर न्यायचं आहे.
भूगर्भाला शोषित केले, ही सभ्यता संपली. मायनिंग व्हावं की, होऊ नये, हा द्वंद असतो. मायनिंगचे दुष्परिणाम कमी करून संपत्ती निर्माण करू शकतो. रोजगार निर्माण करता येतो. पर्यावरण क्लीअरन्सला वेळ लागतो. काही समस्या असतील, तर त्यात सुधारणा करून, असंही फडणवीस यांनी सांगितलं.
मायनिंगसाठी सल्लागार तयार नसतील, तर परदेशातून सल्लागार आणू. पाणी, हवा, मातीवर काय परिणाम होतो. वाहतुकीवर काय परिणाम होतो. या सर्वांचा अभ्यास केला जाईल. मायनिंगचे काही ठिकाणं लीलावासाठी उपलब्ध केले पाहिजे.
इतर राज्यात मायनिंग कार्पोरेशन समृद्ध आहे. मूल्य करून पैसे कमवित आहेत. आशिष जायस्वाल यांनी काही पॉलीसीज तयार केल्या होता. आता नवी मायनिंग पॉलीसी 26 जानेवारीपर्यंत मान्यता देऊ, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला.