नागपूर : शिक्षण सेवकांसाठी महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतला. त्यांच्या मानधानात भरभरून वाढ केली. याबाबत बोलताना शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले, सहा हजार, आठ हजार आणि दहा हजार अशा अल्प मानधनावर शिक्षक सेवकांना काम करावं लागत होतं. आता सोळा हजार, अठरा हजार आणि वीस हजार रुपये मानधन करण्यात आलंय. आतापर्यंतच्या इतिहासात मानधनात झालेली ही मोठी वाढ आहे. शिक्षक सेवकांच्या भावना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कानावर घातल्या होत्या. त्यामुळं आजच्या कॅबिनेटमध्ये त्यांना न्याय मिळाला आहे. यामुळं शिक्षण विभागावर १४४ कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे.
कर्नाटकमध्ये प्रस्ताव मंजुरी झाला. त्यानुसार एक इंचही जागा जाऊ देणार नाही. यावर बोलताना दीपक केसरकर म्हणाले, विरोधकांचं काम एकच आहे. खोटं बोलायचं नि रेटून बोलायचं. सत्तात होतात तेव्हा तुम्हाला जमलं नाही. आम्ही सर्वोच्च न्यायालयात जोर लावला. सीमाभागातल्या लोकांसाठी महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यामुळं कर्नाटक सरकार चवताळून उठलं. गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. वातावरण कसं चांगलं ठेवता येईल, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
सगळ्या सुविधा देणार आहोत. लोकांना न्याय देणं हे आमचं काम आहे. त्यांचे तीन मंत्री कोल्हापूरला आले होते. आम्ही त्यांना अडविलं नाही. कारण आम्हाला आमच्या लोकांना न्याय द्यायचा आहे. सीमेवरील लोकांना न्याय देणं हे आमचं कर्तव्य आहे, असंही त्यांनी सांगितलं.
दिशा सालियन प्रकरणी एकानंही आदित्य ठाकरे यांचं नाव घेण्यात आलं नाही. त्यामुळं ते स्वतःवर का घेतात. एयूसंदर्भात दीपक केसरकर म्हणाले, लोकांशी संबंध ठेवता कामा नये. तुम्ही मोबाईलवर बोलणार. तुम्हाला मेसेज येणार. त्याचं उत्तर जनतेला दिलं गेलं पाहिजे. एयू ते नसतील तर त्यांनी स्वतःला लावून का घ्यावं. त्यांनी त्यांचा गोड गैरसमज दूर केला पाहिजे. चांगलं काम करायला शिकलं पाहिजे. ऑफिसमध्ये जायला शिकलं पाहिजे. स्वतः मंत्री असताना किती तास ते मंत्रालयात गेले. याचा वेळा काढून बघावं.
टायगर एकच होते. त्यांचं नाव बाळासाहेब ठाकरे. उठतात आणि काँग्रेसच्या टेबलकडं जातात. उठतात आणि राष्ट्रवादीच्या टेबलकडं जातात. बाळासाहेब ठाकरे यांना काय वाटणार, हे सगळं बघून आपला नातू असा वागतोय. स्वतःचं भान स्वतःच ठेवावं. त्यांनी आपली वागणूक सुधारावी, असा सल्ला दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरे यांना दिला.