नागपूर : मोटारसायकल अपघातात तीर्थ शहा या तरुणाचा मेंदू मृत झाला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तीर्थच्या आईवडिलांनी अवयवदानास परवानगी दिली. त्यामुळं तीन जणांनी जीवनदान मिळालं. जाता-जाता तीर्थ अवयवदान करून गेला.
भंडारा रोडवरील जगत रेसिडन्सीत राहणारा तीर्थ शहा आई-वडिलांसोबत राहत होता. तीर्थनं बारावीचा परीक्षा उत्तीर्ण केली होती. 14 नोव्हेंबरला तो मोटारसायकलनं पडला होता. त्यानंतर त्याला उटली झाली. रात्री जेवण करून झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठलाच नाही. उठविल्यानंतरही तो उठला नाही. 15 नोव्हेंबरला त्याला न्यू इरा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांच्या चमूनं त्याला व्हेंटिलेटरवर ठेऊन उपचार सुरू केले. दोन दिवसांनंतर तो ब्रेन डेड असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शहा कुटुंबीय दोन वर्षांपूर्वी मुंबईवरून नागपुरात स्थायी झाले. त्याचे वडील देवांश हे एका खासगी कंपनीत, तर आई दर्शना यांचे ब्युटीक आहे. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, मेंदूमध्ये रक्तस्त्राव झाल्यानं तीर्थचा मेंदू मृत झाला होता.
ब्रेन डेड झाल्यानंतर न्यूरो सर्जन डॉ. नीलेश अग्रवाल, कार्डियीक सर्जन डॉ. आनंद संचेती, ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. निधीश मिश्रा यांनी कुटुंबीयांना याबद्दल जाणीव करून दिली. तीर्थच्या अवयवदानातून दुसऱ्यांना जीवनदान मिळेल, यासाठी प्रेरित केले. डॉक्टरांच्या मार्गदर्शनावर तीर्थचे वडील देवांग आणि आई दर्शना यांनी विचार केला. आपल्या मुलाच्या अवयवदानातून तीन जणांनी जीवनदान मिळेल, अशा विचार करून अवयवदानासाठी परवानगी दिली. डॉक्टरांनी झोनल ट्रान्सप्लांट को-ऑर्डिनेशनच्या (झेडटीसीसी) अध्यक्षा डॉ. विभावरी दाणी आणि सचिव डॉ. संजय कोलते यांच्या मार्गदर्शनात वीणा वाठोरे यांनी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण केली. तीर्थची एक किडनी व्होकार्ट रुग्णालयातील एका रुग्णाला, तर दुसरी किडनी न्यू इरा रुग्णालयातील रुग्णाला प्रत्योरोपीत करण्यात आली. याशिवाय डोळ्यांचे कार्निया माधव नेत्र पेढीला सोपविण्यात आले. अशाप्रकारे तीन लोकांना जीवनदान मिळाले.
नागपुरात एक फुफ्फूस प्रत्यारोपण केंद्र आणि चार ह्रदय प्रत्यारोपण केंद्र आहे. परंतु, या ठिकाणी एकाही गरजू रुग्णांची नोंद नव्हती. त्यामुळं ह्रदय व फुफ्फूस बाहेर पाठविण्याचा प्रयत्न झाला. चेन्नईतील रुग्णाला विमानाचे भाडे परवडणारे नव्हते. धुळेतील रुग्णाला फुफ्फूस प्रत्यारोपणासाठी तयार करण्यात वेळ गेल्यानं तीर्थचे ह्रदय आणि फुफ्फूस वाया गेले.
महिला पोलिसानं केली आत्महत्या, घरीच लावला गळफास, पाच वर्षांची मुलगी वाऱ्यावर