नागपूर : विदर्भात खर्रा मिळतो. तो शौकीन चवीनं खातातही. नियमानुसार विक्री बंद असताना तो अजूनही विकला जातो. घेणाऱ्यांवर दंड ठोठावणार, असे प्रशासकीय अधिकारी सांगत असले, तरी कारवाई होताना काही दिसत नाही. हा खर्रा विषारी असून कर्करोगाला आमंत्रण देत आहे. कारवाई मात्र होताना दिसत नाही.
खर्रा तयार करताना काही ठिकाणी सडक्या सुपारीचा वापर करतात. ही सडकी सुपारी कर्करोगाला निमंत्रण देत असल्याचं डॉक्टरांच म्हणणय. 50 टक्के कर्करुग्ण हे खर्रा खाणारे असतात, असं तज्ज्ञांनी सांगितलंय.
सडक्या सुपारीमुळं विषयुक्त पदार्थ खाणाऱ्याच्या पोटात जातात. शाळेच्या परिसराजवळून 100 मीटर दूर अंतरावर दुकानं लावावीत, असा आदेश असताना काही दुकानदार हा आदेश धुळकावून लावतात. काही शाळेकरी मुलेही खर्रा खाण्याच्या आहारी गेले आहेत. खर्रा विक्रेत्यांकडे नेहमी गर्दी असते. त्यामुळं खर्रा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
कोरोनाकाळात हा विषाणू यवतमाळात खर्ऱ्यामधून पसरला होता. त्यामुळं प्रशासनानं खऱ्यावर पूर्णपणे नियमानुसार प्रतिबंद लावला. खर्रा खाणाऱ्याला एक हजार रुपये, तर खर्रा विकणाऱ्याला पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल, असे आदेश प्रशासनानं जाहीर केले होते. पण, या दोन्ही गोष्टी सुरूच आहेत. खाणारे खातात. विकणारे विकतात. उलट चोरून-लपून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्यानं याचे रेट वाढले आहेत. दुप्पट भावात खर्रा मिळत आहे. पण, खर्रा शौकिनांवर याचा काहीही परिणाम पडत नाही.
कारवाईसाठी मनपाचे उपद्रव शोध निर्मूलन पथक नेमण्यात आले आहेत. स्वच्छता निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनी कारवाईचे अधिकार देण्यात आले आहेत. पण, ते पुरेशा प्रमाणात नाहीत. तरीही असे काही होत असेल, तर याविरोधात धडक मोहीम राबविणार असल्याचं अन्न औषध प्रशासन विभागाचे अभय देशपांडे यांनी सांगितलं.
वीस-पंचवीस रुपयांचे खर्रा आता चाळीस-पन्नास रुपयांना मिळत आहे. तरीही खर्रा खाणारे काही कमी करत नाही. प्रशासनाचाही यावर काही अंकूश नाही. त्यामुळं सारेकाही आलबेल सुरू आहे.
तीर्थ शहाचे अवयवदान, दोघांना मिळाली दृष्टी, तिघांना जीवनदान
महिला पोलिसानं केली आत्महत्या, घरीच लावला गळफास, पाच वर्षांची मुलगी वाऱ्यावर