नागपूर : आझाद कॉलनीतील (Azad Colony) अयान हा आठ वर्षांची चिमुकला. गेल्या दोन वर्षानंतर शाळेत गेला. शाळेतून परत येत असताना टँकर चालकानं त्याला धडक दिली. यात घटनास्थळीच अयानचा जीव गेल्याची घटना सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास घडली.
अयान इरफान (वय आठ वर्षे) असं मृत बालकाचं नाव आहे. सक्करदऱ्यातील (Sakkaradara) आझाद कॉलनीत अयान झोपडपट्टीत राहतो. गेल्या दोन वर्षानंतर शाळा सुरू झाली. आता आपण चांगलं शिक्षण घेऊ असं अयानला वाटलं. रस्त्यात काही होईल, याची त्याला काही कल्पना नव्हती. तो शाळेत जाण्यासाठी घराबाहेर पडला. तो घरी परतलाच नाही. त्याचा मृतदेह घरी आला.
सोमवारी सकाळी अकराची घटना. तो त्याच्या मित्रासोबत घराकडं परत येत होता. समोरून पाण्याचा भरधाव वेगात टँकर आला. चालक हमीद खान (वय २४) यानं निष्काळजीपणे वाहन चालवून अयानला जोरदार धडक दिली. टँकरच्या धडकेत छोटाचा जीव गंभीर जखमी झाला. रुग्णालयात डॉक्टरांनी अयानचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. अपघातामुळं परिसरात तणाव निर्माण झाला होता. सक्करदरा पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी हमीद खानविरोधात गुन्हा दाखल केला.
अयान गेल्या दोन वर्षांपासून घरीच असल्यानं कंटाळला होता. मला शाळेत जायला आवडेल. खूप मज्जा करू, असं त्याला वाटत होतं. कारण लॉकडाऊनमध्ये त्याची सजा झाली होती. घराबाहेर पडता आलं नाही. झोपडपट्टीतपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहचलेच नव्हते. घराबाहेर पडताना घरचे लोक अयानला भीती दाखवत होते.
नागपुरात थंडी जोरात आहे. घराबाहेर पडणे तसे कठीण आहे. पण, अत्यावश्यक सेवेसाठी जावचं लागते. थंडी असूनही अयान घराबाहेर पडला. शाळा कशाला बुडवायची असं त्याला वाटलं. पण, या थंडीच्या कडाक्यात त्याच्या कोवळ्या देहावरून टँकरची चाकं गेली. या चाकांखाली त्याच्या शरीराची वाताहत झाली.