नागपुरात गुंडांचा हैदोस कमी होण्याचं नाव घेत नाही. आता तर चक्क शाळेलाच निशाणा बनविण्यात आलाय. धरमपेठ येथील (Dharampeth) व्हीआयपी रोडवरील बिशॉप कॉटन स्कूलला (Bishop Cotton School) दोन दिवस सुट्टी होती. मात्र आज सकाळी शाळा उघडताच शाळेच्या आवारात असलेल्या कुंड्या तोडण्यात आल्याचे दिसल्या. एक दोन नाही तर दिसेल ती कुंडी अज्ञात इसमांनी तोडली. एवढ्यावरच ते थांबले नाही तर क्लासरूमच्या आतमध्ये दारूच्या बॉटल्स फेकण्यात (Liquor bottles smashed in classrooms) आल्या. अर्थिनसाठी लावलेली तार सुद्धा या गुंडांनी तोडली. महत्वाचं म्हणजे अशा घटना या ठिकाणी वारंवार घडत असतात. मात्र त्यावर लगाम लावला जात नाही. रोडच्या बाजूला असलेल्या बस स्थानकावर रात्रीच्या वेळी समाज कंटक बसतात. तिथे दारू पितात आणि नंतर अश्याप्रकारे हैदोस घालण्याचा काम करतात. याची तक्रार पोलिसात करण्यात आली. पोलिसांनी दोन कर्मचारी शाळेत तैनात केलेत. शाळेत झालेल्या तोडफोडीची तक्रार मुख्याध्यापिका सोनिया सिंग यांनी पोलिसांत केली आहे.
दोन दिवस शाळेला सुटी होती. आज सकाळी शाळा सुरू करण्यात आली. तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. शाळेतील कुंड्या फोडण्यात आल्या. काही ठिकाणी दारुच्या बॉटल्स फोडण्यात आल्या आहेत. शाळेला सुटी असल्यानं दारुड्यांनी या ठिकाणाला आपला अड्डा बनविला असेल. त्यातून ही घटना घडली असावी, असा अंदाज आहे.
नागपूरच्या बिशॉप कॉटन स्कूलमध्ये काही समाजकंटकांनी अशाप्रकारे तोडफोड केली. pic.twitter.com/aO2tCmVmOR
— Govind Hatwar (@GovindHatwar) April 4, 2022
नुकसान काय झालं
कुंड्यांमध्ये रोपटे लावण्यात आले होत्या. त्या कुंड्यावरच हा राग काढण्यात आला. या घटनेमुळं शाळेचं प्रशासन हादरलं आहे. त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलीस घटनेचा तपास करत आहेत. शाळा हे पवित्र ठिकाण समजलं जाते. पण, शाळेत कुणी नसल्याचं पाहून समाजकंटकांनी या शाळेलाच दारुचा अड्डा बनविला. दारु जास्त झाल्यानंतर त्यांच्यात वाद झाला असावा. यातून त्यांनी ही तोडफोड केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.