नागपूर : विदर्भासह राज्याच्या बऱ्याच भागात तापमानात वाढ (Temperature Rise) झालीय. त्यामुळे शेतातील भाजीपाल्याची पिकं करपल्याने त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालाय. गेल्या आठ दिवसांत नागपूरच्या किरकोळ बाजारात भाज्यांचे दर दुप्पटीने वाढलेत. एकीकडे उन्हामुळे शेतातील भाजीपाला पिकं करपल्याने शेतकऱ्यांचं नुकसान (Loss of Farmers) झालंय. तर दुसरीकडे भाज्यांच्या दरवाढीमुळे ग्राहकांना (Consumers) फटका बसतोय. सध्या नागपूरच्या किरकोळ बाजारात फरसबी 160 रुपये किलो, फुलकोबी, कोथिंबीर 120 रुपये किलो, टोमॅटो 50 रुपये किलो आणि वांगी 80 रुपये किलो आहे. तापमान वाढल्याने गेल्या आठ दिवसांत सर्वच भाज्यांचे दर दुप्पट झालेत. अशी माहिती किरकोळ भाजी विक्रेता रितेश मुडेवार यांनी दिली.
उन्हामुळं अंगाची लाहीलाही होतेय. माणसं, पशूपक्षीचं काय, तर भाजीपाल्याच्या उत्पादनावरही तापमान वाढीचा परिणाम झालाय. उन्हामुळं पिकं करपली. उत्पादन कमी होत असल्यानं भाजीपाल्याचे दर वाढलेत. भाजीपाल्याच्या दरवाढीचा फटका ग्राहक व शेतकरी दोघांनाही बसतोय.