नागपूर : कळमना परिसरात कलेक्शनसाठी घरी गेलेल्या एजंटची नियत फिरली. अकरा वर्षीय मुलीशी लगट करण्याचा प्रयत्न त्यानं केला. पण, ती ओरडल्यानं शेजारी जमा झाले आणि त्याला चांगलाच प्रसाद खावा लागला.
कळमन्यात बँकेचा एजंट डेली कलेक्शनसाठी एका घरी गेला. तिथं त्याला अकरा वर्षीय मुलगी दिसली. घरी कुणीच नसल्याच पाहून त्याची नियत फिरली. त्यानं घरात घुसून तिच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. पण, ती चिमुरडी ओरडली. शेजारचे लोक जमा झाले. त्यांनी त्या एजंटला चांगलेच धुतले. पोलिसांना बोलावण्यात आले. तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली. राजू मानकर असं आरोपीचं नाव आहे.
ही घटना आहे सक्करदरा पोलीस ठाण्यातली. कॅटरिंग व्यवसाय करताना युवतीचे मिथून पाटील याच्याशी चांगले संबंध होते. पण, गेल्या वर्षी तिचे लग्न झाले. तरीही तो तिचा पिच्छा सोडत नव्हता. तुझ्या पतीला आपल्या जुन्या संबंधाबद्दल सांगेन, अशी धमकी देत होता. भेटायला बोलावत होता. तिचे लग्न झाल्यानं ती त्याला भेटू शकत नव्हती. ती नकार देत होती. त्यामुळं मिथूननं तिचा पाठलाग सुरू केला. मोबाईलवर अश्लील मॅसेजेस पाठवित असे. दरम्यान, तिच्या पतीला मिथून तिचा पाठलाग करताना दिसला. तीनं सारी हकिकत पतीला सांगितली. त्यांनी मिथून विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिथूनवर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय.
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील कुंभारटोली येथील 25 वर्षीय नवल शिवचरण कनपुरिया या युवकाचा आज नवतलावात बुडून मृत्यू झाला. मृतक हा आपल्या घराजवळील धन्नालाल रामटेके यांच्या इथे अंत्यविधीसाठी आलेल्या पाहुण्यांसोबत घराजवळील नवतलावात सकाळी आंघोळ करण्याकरिता गेला होता. तो पाण्यामध्ये खोलवर गेल्याने त्याच्या मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज लावण्यात येत आहे. नवल कनपुरिया यांचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आलाय. मृतदेहाच्या पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले आहे.