सुनील ढगे, Tv9 मराठी, प्रतिनिधी, नागपूर : 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने नागपूरच्या दीक्षाभूमीवर भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळे दीक्षाभूमीवर हा सोहळा साध्या पद्धतीने साजरा केला जात होता. यावर्षी मात्र देशभरातून हजारोच्या संख्येने अनुयायी दीक्षाभूमीवर पोहोचले. नागपूरच्या या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. तेव्हापासून हा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो. पूर्वसंध्येपासूनच या ठिकाणी गर्दी पाहायला मिळत आहे. आज सकाळी तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचा चित्र पाहायला मिळते. दीक्षाभूमीवर अनुयायी बाबासाहेबांसमोर नतमस्तक होऊन नवीन ऊर्जा मिळत असल्याचं सांगतात.
नागपूरच्या दीक्षाभूमीवर आज सकाळपासून बुद्ध अनुयायांची मोठी गर्दी उसळली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलिसांनी कडेकोट असा बंदोबस्त केला आहे. सर्वत्र सीसीटीव्हीची नजर सुद्धा आहे. दीक्षाभूमीवर भीमसैनिकांनी मोठी गर्दी केली.
भीमसैनिकांसाठी ठिकठिकाणी भोजनदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कचरा व्यवस्थापन तसेच पाण्याची सुविधा नागपूर मनपातर्फे पुरविण्यात येत आहे. देशभरातून बाबासाहेबांना मानणारे भीमसैनिक आले आहेत.
बाबासाहेब आणि बुद्धांच्या प्रतीमा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बाबासाहेबांवर आधारित साहित्य पुस्तकप्रेमी खरेदी करतात. या ठिकाणी बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. त्यामुळं या दिनाला धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणतात.
यानिमित्त दीक्षाभूमी परिसर सजविण्यात आला आहे. प्रबोधनात्मक कार्यक्रम परिसरात साजरे केले जात आहेत. कालपासूनचं भीमसैनिक दूरवरून आले आहेत. त्या सर्वांसाठी सुविधा पुरविण्यात आल्या आहेत.
बाबासाहेबांसमोर नतमस्तक झाल्यानंतर ऊर्जा मिळत असल्याचं भीमसैनिक सांगतात. गावागावात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध बांधव कार्यक्रम घेतात.