नागपूर : नागनदी पुनरुज्जीवन (Nagnagi Revival) व संवर्धन प्रकल्पाला 27 ऑक्टोबर 2021 रोजी एक्सपेंडिचर फायनान्स कमिटीची मंजुरी मिळाली होती. वित्त विभागाच्या (Finance Department) एक्सपेंडिचर फायनान्स कमिटीने नाग नदी पुनरुज्जीवन व संवर्धन प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. यामुळे नाग नदीच्या पुनरुज्जीवन प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होऊ शकते. नाग नदीवरून नागपूर शहराची ओळख आहे. परंतु, हीच नागनदी शहराच्या प्रदूषणास कारणीभूत ठरते. प्रदूषण दूर करणे हे फार मोठे आव्हान आहे. हे आव्हान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) यांनी स्वीकारले. या नागनदीतून सीप्लेन उडविण्याचे स्वप्न नितीन गडकरी पाहत आहेत. ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलत आहेत.
नाग नदीतील पाणी स्वच्छ राहावे, यासाठी केंद्र शासनाने नागनदी पुनरुज्जीवन प्रकल्पाला यापूर्वीच मंजुरी दिली होती. नागपूर शहरासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यीकरणात विलक्षण भर पडणार आहे. या कामासाठी आठ वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. या अंतर्गत 92 एमएलडी क्षमतेचे तीन एसटीपी प्रकल्प तयार केले जाणार आहेत. 500 किमी सीवरेज नेटवर्क, पंपीकरण स्टेशन, कम्युनिटी टॉयलेट निर्माण केले जाणार आहे.
…आणि ‘जायका’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
याबाबत तातडीने कन्सल्टंट नियुक्त करून सुधारित डीपीआर तयार करण्याचे आणि कामाची गती वाढवण्याचे निर्देश या बैठकीत दोन्ही मंत्र्यांनी दिले. pic.twitter.com/kP4l2YgopN
— Office Of Nitin Gadkari (@OfficeOfNG) February 23, 2022
नाग नदी सांडपाणी आणि औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक पाण्यामुळे दूषित झाली आहे. या नदीतून वाहणारे सांडपाणी प्रक्रिया करून स्वच्छ करण्यात येणार आहे. नदीतील सांडपाणी, कचरा, नाग नदीला मिळणार्या उपनद्या, नाले यातून होणारे प्रदूषण कमी करण्याचे काम केले जाईल. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी तातडीने सल्लागार नियुक्त करा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले. प्रकल्पाचा सुधारित आराखडा तयार करत कामाला गती द्या, असेही गडकरी यांनी सांगितले. नाग नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाबाबत नवी दिल्ली येथे जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत, जलशक्ती मंत्रालयाचे सचिव पंकज कुमार, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. आणि जायकाच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत ना. गडकरी बोलत होते.