नागपूर : राज्यात शिवसेनेतील दुफळी समोर आली. एकनाथ शिंदे यांचा गट वेगळा निघालाय. त्यामुळं शिवसैनिक विखुरले गेलेत. काही शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. तर काही शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देत आहेत. नागपुरात काल एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात फलकं लावण्यात आला होता. या फलकाला आज शिवसेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी फाडले. शिवसेनेत दुफळी माजविण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलंय. नागपुरात काल भाजपच्या एका कार्यकर्त्यानं (activist) एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात फलक लावलं होतं. इतवारी (Itwari) गांधी पुतळा चौकात हे फलंक लावण्यात आलं होतं. हे फलकं फाडून आम्ही निषेध केल्याचं युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यानं सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात नागपूर शहरात (Nagpurcity) फलकं लावू देणार नाही. तरीही कुणी लावण्याचा प्रयत्न केला, तर युवा सेना ही शिंदेंच्या समर्थनातील फलकं फाडेल, असा इशारा युवा सेनेच्या वतीनं देण्यात आलाय.
लोकांचा नाथ एकनाथ. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्ववादी विचार आत्मसात केलेत. आनंद दिघे यांची शिकवण पुढं नेत आहेत. अशा या एकनाथ शिंदे यांना त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा अशाप्रकारचे फलकं लावण्यात आले. हे उंच ठिकाणी चौकात लावण्यात आले.
युवा सेनेचे काही कार्यकर्ते फलक लावलेल्या ठिकाणी आले. त्यांनी सोबत शिवसेनेचा फगवा झेंडा सोबत घेतला होता. जय भवानी जय शिवाजीच्या ते घोषणा देत होते. ते फलक लावलेल्या ठिकाणी उंचावर चढले. त्यानंतर फलकं फाडला. त्या ठिकाणी शिवी लिहिली. यावेळी युवासेनेचे पाच-सहा कार्यकर्ते उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांच्या समर्थनात फलकं शहरात लावू देणार नाही. कुणी लावण्याचा प्रयत्न केला, तर अशा प्रकारचे फलकं फाडून टाकू, असा इशारा युवा सेनेच्या नागपुरातील कार्यकर्त्यांनी दिला. त्यामुळं हा वाद आता आणखी किती दिवस चालेल, हे येणारी वेळच सांगेल.