महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची चिन्ह निर्माण झाली आहे. महाविकास आघाडीमधील घटन पक्ष असलेला काँग्रेस शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेवर नाराज आहेत. त्यामुळे शनिवारी होणाऱ्या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले जाणार नाही तर विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी आपणास या विषयाची माहितीच नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीत सर्व काही आलबेल नसल्याचे समोर आले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीची आज मुंबईत दुपारी दोन वाजता पत्रकार परिषद होत आहे. जनतेचे आभार मानण्यासाठी ही पत्रकार परिषद होते आहे. या पत्रकार परिषदेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे उपस्थित राहणार नाहीत. काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण हे उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे. तर नाना पटोले भंडारा-गोंदिया लोकसभेत कार्यकर्त्यांच्या भेटी-गाठी दौऱ्यावर असल्यामुळे उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात आले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले महाविकास आघाडीत नाराज आहे. त्यामुळे ते पत्रकार परिषदेत जाणार नाही, असे सांगितले जात आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना काँग्रेसला विचारत न विचारत घेता परस्पर निर्णय घेतात. सांगली लोकसभेच्या जागेवर तसाच निर्णय झाला. यामुळे नाना पटोले नाराज आहेत. त्यांनी विधानसभेची स्वबळाची तयारी सुरु केली आहे. राज्यात २८८ जागांवर लढण्याची तयारी सुरु आहे. त्याचवेळी विरोधी पक्षनेते विजय वड्डेट्टीवार यांनी आपणास निमंत्रण नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आपण जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
महाविकास आघाडीची आभार बैठकीला नाना पटोले उपस्थित राहणार का? यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, ही बैठक अचानक ठरली आहे. माझा दौरा त्यापूर्वीच निश्चित झाला आहे. यामुळे आभार बैठकीला काँग्रेसतर्फे राज्याचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि बाळासाहेब थोरात उपस्थित राहतील. मी विदर्भाच्या दौरा असल्याने त्या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाही, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाच्या मराठा आमदारांची बैठक घेतली. त्यावर बोलताना काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, निवडणुका असल्यामुळे देवेंद्र फडणवीस अशा प्रकारच्या बैठक घेतली आहेत. भाजपने जो खड्डा खोदलेला आहे, त्यांनी जे पाप केले आहे, त्याचे परिणाम त्यांना दिसत आहे. मोदींनी जाती निहाय जनगणना करावी, अशी मागणी राहुल गांधी यांची होती. तीच मागणी त्यांनी पूर्ण करावी. त्यामुळे महाराष्ट्रातील नाही तर देशातील आरक्षणाच्या प्रश्न सुटू शकतो.