Nanded | गुरांना वाचवायला गेले अन् कार उलटली, तिघे गंभीर जखमी, नांदेडच्या देगलूर तालुक्यातील घटना

| Updated on: Apr 27, 2022 | 4:24 PM

देगलूर तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर हा अपघात झाला. देगलूर तालुक्यातील नरंगल गावातील डॉक्टर आकाश पाटील यांचे कुटुंब तेलंगणा राज्यातून गावाकडे परतत होते.

Nanded | गुरांना वाचवायला गेले अन् कार उलटली, तिघे गंभीर जखमी, नांदेडच्या देगलूर तालुक्यातील घटना
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेडः भरधाव वेगाने जाणाऱ्या कारसमोर (Car Accident) अचानक गुरे आल्यामुळे कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले. गुरांना वाचवण्यासाठी कारचे स्टेअरिंग एवढे जास्त फिरवले की ही कार रस्त्याच्या कडेलाच पलटी झाली. या घटनेत कारमधील तिघेजण गंभीर जखमी झाले. देगलूर तालुक्यातील नरंगल गावातील डॉक्टर आकाश पाटील (Akash Patil) यांच्या कुटुंबाच्या कारला हा अपघात झालाय. घटनेत गंभीर जखमी झालेल्या तिघांवर नांदेडच्या रुग्णालयात (Nanded hospital) उपचार सुरु आहेत.

तेलंगणा राज्याच्या सीमेवर अपघात

देगलूर तालुक्यातील तेलंगणा राज्याच्या सीमेवर हा अपघात झाला. देगलूर तालुक्यातील नरंगल गावातील डॉक्टर आकाश पाटील यांचे कुटुंब तेलंगणा राज्यातून गावाकडे परतत होते. त्याचवेळी रस्त्यावर गुरांचा समूह आला. त्यामुळे जनावरांचे प्राण वाचवण्याच्या नादात ही कार पलटी झाली. यातील तिन्ही जखमींना उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलं आहे.

जालन्यात वाळू वाहून नेणाऱ्या वाहनाचा अपघात

जालन्यात मंगळवारी रात्री वाळू वाहून नेणाऱ्या वाहनांचा भीषण अपघात झाला. यात वाळूच्या टेम्पोचा चालक जागीच ठार झाला. मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेतील इतर जखमींना रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. जालना जिल्ह्यातील तळणी ते लोणार रोडवर सदर घटना घडली. लोणारकडे जाणाऱ्या रस्त्यावर सरहद वडगाव पाटीजवळ हा अपघात झाला. यात कानडी गावातील सचिन खंदारे या तरुणाचा मृत्यू झाला. हा तरुण वाळूच्या टेम्पोवर चालक म्हणून कामाला होता.