कणकवलीत बॅनर वॉर सुरूच…बाप बाप होता है…शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचे जोरदार उत्तर

| Updated on: Jun 16, 2024 | 10:54 AM

कणकवलीत बॅनर वॉर सुरूच आहे. आता बाप बाप होता है.....अशा आशयाचा नारायण राणे यांचा फोटो असलेला बॅनर लागला आहे. शिंदे गटाच्या बॅनरला राणे स्टाईलने उत्तर देण्यचा प्रयत्न या बॅनरमधून करण्यात आला आहे. कणकवली शिवाजी चौकात सुरू झालेले बॅनर वॉर आता कणकवलीच्या मेन नाक्यावर आले आहे.

कणकवलीत बॅनर वॉर सुरूच...बाप बाप होता है...शिंदे गटाच्या बॅनरला नारायण राणे गटाचे जोरदार उत्तर
कणकवलीत लागलेले बॅनर
Follow us on

पुणे शहरानंतर आता कोकणात बॅनरवार सुरु झाले आहे. कोकणातील हे बॅनर वार महाविकास आघाडी अन् महायुती दरम्यान नाही. महायुतीमधील शिवसेना आणि भाजपमध्येच बॅनर वार रंगले आहे. कणकवली शिवसेना शाखेबाहेर शनिवारी बॅनर लागला होता. त्यात म्हटले होते ‘वक्त आने दो…जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ त्या बॅनर शिवसेना नेते उदय सामंत अन् त्यांचे बंधू किरण सामंत यांचा फोटो होता. हे बॅनर म्हणजे नारायण राणे यांना इशारा देण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राज्यातील राजकारणात रंगली होती. उदय सामंत यांनी हे बॅनर म्हणजे विरोधकांचे कृत्य असल्याचे म्हटले होते. त्या बॅनरनंतर रविवारी पुन्हा एक बॅनर लागले आहे. त्यात बाप बाप होता है…, असे लिहिले असून शिंदे गटाला डिवचले आहे.

नारायण राणे गटाकडून उत्तर

कणकवलीत बॅनर वॉर सुरूच आहे. आता बाप बाप होता है… झुंडमे कुत्ते आते है शेर अकेला आता आहे… अशा आशयाचा नारायण राणे यांचा फोटो असलेला बॅनर लागला आहे. शिंदे गटाच्या बॅनरला राणे स्टाईलने उत्तर देण्यचा प्रयत्न या बॅनरमधून करण्यात आला आहे. कणकवली शिवाजी चौकात सुरू झालेले बॅनर वॉर आता कणकवलीच्या मेन नाक्यावर आले आहे. पटवर्धन चौकात हे बॅनर लावले आहे. रत्नागिरीत ही रात्री या आशयाचे बॅनर लागले होते. हे बॅनर वॉर नेमके काय स्वरूप घेत याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कणकवलीत लागलेले बॅनर

वक्त आने दो…ला हे उत्तर होते का?

कणकवलीत शनिवारी लागलेले बॅनर म्हणजे नारायण राणे यांना डिवचण्याचा प्रकार होता. त्यात ‘वक्त आने दो…जबाब भी देंगे और हिसाब भी लेंगे’ असा मजकूर या बॅनरवर आहे. त्याल उत्तर रविवारी दिले की काय? अशी चर्चा रंगली आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार होते. शेवटपर्यंत त्यांनी शिवसेनेकडून तिकीट मिळावे, यासाठी प्रयत्न केले. परंतु ही जागा भाजपकडे गेली. त्यामुळे नारायण राणे यांनी बाजी मारली.

हे सुद्धा वाचा

कणकवलीत लागलेले बॅनर

लोकसभेत मतभेद विसरुन उदय सामंत आणि नारायण राणे यांनी काम केले. त्यामुळे नारायण राणे विजयी झाले. परंतु आता बॅनरच्या माध्यमातून दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते समोरासमोर येत आहे. हे बॅनर कोणी लावले आहे, ते समोर आलेले नाही. उदय समांत यांनी हे विरोधकांचे कारस्थान असल्याचा आरोप केला आहे.