जरांगे यांच्या आंदोलनामुळे मराठ्यांपेक्षा मुस्लिमांना जास्त फायदा झाल्याचं नितेश राणे यांनी म्हटले आहे. जरांगे हे आधुनिक मोहम्मद अली जिन्ना नाही ना असा प्रश्न विचारला जातोय. जेव्हा तुम्ही गोधडीत होते तेव्हा राणे साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण देऊन दाखवले आहे. असं नितेश राणे म्हणाले. यावर उत्तर देताना जरांगे पाटील यांनी म्हटलं की, यांनी फक्त राजकीय पोळी भाजलीये. खासदार नारायण राणे यांनी देखील मनोज जरांगे यांच्यावर टीका केलीये. ते म्हणाले की, ‘नितेश राणे चांगला शिकलेला आहे. त्यामुळे त्यांनी जे विधान केलं त्यांच्याकडे काही माहिती असेल. जरांगे एवढा मोठा नाही की त्यांच्यासाठी बीजेपी सारख्या पक्षाने अभियान सुरू करावं. जरांगे कोण माणूस आहे? आम्हाला आणि आमचे आमदाराला कोणी सांगायची गरज नाही. जरांगे पाटील यांना राजकीय अभ्यास नाही. आमच्या देवेंद्र फडणवीस यांचा चांगला अभ्यास आहे. जरांगे यांनी फक्त झोपून आंदोलन करावं.’
उद्धव ठाकरे यांना कोणी विचारत नाही. दिल्लीत इंग्रजीत बोलावं लागतं. त्यांना ना इग्रंजी येते ना हिंदी. मराठी तिथे चालत नाही. उद्धव ठाकरे हे दिल्लीला कशासाठी जातात. त्यांचा पक्ष एकदम छोटा आहे. त्यांना कोणतेही महत्त्व नाही. त्यामुळे दिल्लीत त्यांचं काही चालणार नाही. वफ्फ बोर्डाच्या जमिनीबाबत त्यांना काही माहित नाही. असं देखील नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना म्हटले आहे.
मराठा आरक्षणाची लढाई सात आठ महिने झाले सुरू आहे. ही गरजवंतांसाठी लढाई सुरू आहे. हा लढा बंद पडावा म्हणून अनेकांनी प्रयत्न केले. हा लढा बंद पडावा म्हणून छगन भुजबळ यांना मध्ये पाडले. पण उपयोग झाला नाही. फडणवीस यांनी हा लढा बंद पडावा म्हणून अनेक प्रयत्न केले पण मी हाणून पाडले. सातारकरांना महत्वाचा विषय सांगतो. राजकीय नेत्यांना बळी पडू नका. तुम्ही घरी बसू नका. नाहीतर आरक्षण हातून जाईल. सातारा ही शूरवीरांची भूमी आहे. साताऱ्यात जात पडताळणी विषय मार्गी लागला नाही तर आठ दिवसात इंगा दाखवतो. पण तुम्ही घरी बसू नका. असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी सातऱ्यात बोलताना म्हटले आहे.