सिंधुदुर्ग: माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे महाराष्ट्राचे दबंग नेते आहेत. झोप विसरून ते मेहनत करतात. आज मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने त्यांची स्वप्नपूर्ती होत आहे, अशा शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नारायण राणे यांचं कौतुक केलं. (narayan rane is a maharashtras daban leader devendra fadnavis)
सिंधुदुर्ग येथे नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्राचे दबंग नेता म्हणून नारायण राणे यांची ख्याती आहे. अनेक लोकं स्वप्न पाहतात. स्वप्न पाहणं हे सोपं असतं. पण स्वप्न पाहिल्यानंतर आपली झोप विसरून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करतात, असे लोक कमी असतात. त्यामधील नारायण राणे हे एक. सिंधुदुर्गात मेडिकल कॉलेज उभारणं हा फार धाडसी निर्णय होतं. 650 हॉस्पिटल उभारणं हे खूप आव्हानात्मक आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
राणेंचा संघर्ष पाहिला
मी स्वत: अतिशय जवळून राणेंचा संघर्ष बघितलाय. मेडिकल कॉलेज उभारताना अनेक अडचणी आल्या. इतके इन्स्पेक्शन होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तरतूदी असतात. इतकी गुंतवणूक केल्यानंतर वर्ष-दोन वर्ष वाट पाहावी लागते. या सगळ्या गोष्टींना सामोरे जात त्यांनी सगळा पाठपुरावा केला. अखेर या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झालं. या स्वप्नपूर्तीचा आनंद राणेंच्या चेहऱ्यावर पाहतोय, असं त्यांनी सांगितलं.
राणेंच्या यशामागचं रहस्य म्हणजे वहिनी
या कार्यक्रमात एक कमतरता आहे. या कॉलेजच्या अध्यक्षाखाली बसल्या आहेत. बाकी आपण सगळे वर बसलो आहोत. पण राणे साहेबांच्या यशामागचं रहस्य तेच आहे. वहिनी मागे राहून त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहतात. त्यामुळे यशाची वेगवेगळे शिखरे राणे पादक्रांत करत असतात, असं फडणवीस यांनी म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
समृद्धीवरून टोले
राणेंनी सांगितलं. त्यांना मेडिकल कॉलेज उघडण्यात अनेक अडचणी आल्या. दादा हे काय आपल्याला नवीन आहे का? समृद्धी महामार्ग करताना किती अडचणी आल्या. किती खो घालण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राला माहीत आहे. श्रेय मिळत नसेल तर विरोध करायचा आणि तरीही काम झालं तर त्याचं श्रेयही घ्यायचं असं काम हे लोक करत असतात, असा टोला फडणवीस यांनी शिवसेनेला नाव न घेता लगावला. (narayan rane is a maharashtras daban leader devendra fadnavis)
विकास कामांना विरोध आणि उद्घाटनाला आयत्या बिळावर नागोबा म्हणजे शिवसेना : नारायण राणेhttps://t.co/JyU8ZjRsUk#NarayanRane #AmitShah #Shivsena #Sindhudurg @MeNarayanRane @NiteshNRane @ShivSena
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 7, 2021
संबंधित बातम्या:
LIVE : यशाची नवनवी शिखरं नारायण राणे पादाक्रांत करत आहेतः देवेंद्र फडवणीस
नारायण राणेंना केंद्रात बढती मिळणार?; अमित शाहांच्या कोकण दौऱ्यामुळे जोरदार चर्चा
प्रकाश आंबेडकर म्हणतात; मोदींचा अख्खा मेंदू महाराष्ट्रात! कुणाला डिवचताय?
(narayan rane is a maharashtras daban leader devendra fadnavis)