मुंबईः शिवसेना भवनातील (Shivsena Bhavan) संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्रकार परिषदेनंतर आजच्या नारायण राणेंच्या (Narayan Rane) प्रतित्यूत्तर दाखल घेतलेल्या पत्रकार परिषदेने आज पुन्हा राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. यावेळी नारायण राणे यांनी मराठी माणसाचा मुद्दे पुढे करून शिवाजी महाराजानंतर यांनी काय केले आहे असा सवालही त्यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून यांनी काहीही केले नाही. हे संजय राऊन लोकांचा लक्ष भटकावण्यासाठी ते नाही ते बरळत आहेत असा जोरदार हल्ला त्यांनी चढविला. तसेच तुझं रक्त भेसळय म्हणत राऊतांच्या भाषेला राणे यांनी त्याच भाषेत प्रत्त्युत्तर दिले. ही पातळी कुठपर्यंत घसरणार? असे म्हणत त्यांनी शिवसेना आणि नेत्यांवर टीका केली.
आजच्या नारायण राणेंच्या पत्रकार परिषदेत आज त्यांनी संजय राऊत यांना शिवराळ भाषा म्हणजे मर्दानी नव्हे असंही त्यांना राणे स्टाईलने त्यांना त्यांनी सुनावले. संजय राऊत तुम्ही कोणालातरी सोडला आहात का असा प्रश्न विचारून त्यांनी वडीलांना वडील म्हणालास का की प्रत्येक वेळेस बदलतोस असा खोचक टोमणा मारून त्यांनी संजय राऊत यांची पात्रता काढली.
यावेळी त्यांनी टीका करत असताना हेही सांगितले की, आम्हाला कोणाची गरज नाही, आमचे हात त्यासाठी समर्थ आहेत, तुमच्यासारखं आम्ही कुणाचा वापर करत नाही असे सांगत कालच्या संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेला महत्वाचे नेतेत कोण होते असा सवाल उपस्थित केला आणि आमच्यावर बोलण्याची तुमची पात्रता नाही असंही त्यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.
संजय राऊत ज्या घोटाळ्यावर बोलत आहेत ते सिद्ध करणार का असा सवालही त्यांनी विचारला. यावेळी त्यांनी 19 बंगाल्याविषयी बोलत अनेक प्रकरणावर त्यांनी टीका केली. तर दुसरीकडे 19 बंगल्यांचं प्रकरण राजकारण तापणार असंही दिसत आहे. नारायण राणे यांनी जोरदार टीका करत संजय राऊत आणि शिवसेना हल्लाबोल केला तर पत्रकारांनी प्रश्न विचारताच नारायण राणे यांनी मिलिंद राणे यांनाही सोडले नाही. मिलिंद नार्वेकर कोण असा प्रतिसवाल करुन ते मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते का, ते त्यावेली बेल मारली की पाणी आणू का असं ते म्हणायचे आणि आता तो आता नेता बनला. तोच का? असे विचारत संजय राऊत यांच्या घामावर ते बोलत राहिले.
संबंधित बातम्या
संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे, त्यांना सुपारी मिळाली-राणे
संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर, राऊत पूर्ण राष्ट्रवादीचे, त्यांना सुपारी मिळाली-राणे