Narayan Rane vs Shiv Sena LIVE : नितेश राणेंना जामीन नाकारला, न्यायालयाचा मोठा झटका

| Updated on: Jan 01, 2022 | 8:04 AM

नितेश राणे यांना जिल्हा सत्र न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे नितेश राणेंच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. पोलिसांकडून नितेश राणे यांचा शोध सुरू आहे, संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे अडचणीत आले आहेत.

Narayan Rane vs Shiv Sena LIVE : नितेश राणेंना जामीन नाकारला, न्यायालयाचा मोठा झटका
नारायण राणे यांना कणकवली पोलिसांची नोटीस
Follow us on

सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयाने (Sindhudurga District Court) फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे आणि गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आमदार नितेश राणे यांना हा निकाल मोठा धक्का मानला जात आहे. मात्र, असं असलं तरी नितेश राणे आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांच्या वकिलांकडून तशी माहिती देण्यात आली आहे.

नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का?

नितेश राणे अद्याप पोलिसांसमोर दाखल झालेले नाहीत. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता नितेश राणे पोलिसांसमोर हजर होणार का? किंवा पोलीस नितेश राणेंना अटक करणार का? असा सवाल केला जात आहे. मात्र, नितेश राणे यांना उच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार आहे. जामीन मिळवण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयात जाऊ. तोपर्यंत नितेश राणे यांना पोलिसांकडे हजर होण्याची गरज नाही, असं नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी म्हटलंय. मात्र, पोलिसांनी त्यांना अटक केली तर आम्ही जामीनासाठी अर्ज करु असंही त्यांनी म्हटलंय.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 30 Dec 2021 04:40 PM (IST)

    नितेश राणेंना अटकपूर्व जामीन नाही, न्यायालयाचा जोरदार झटका

    नितेश राणेंना अटकपूर्व जामीन नाही, न्यायालयाचा जोरदार झटका

  • 30 Dec 2021 04:27 PM (IST)

    नितेश राणेंना बेल की जेल? पुन्हा सुनावणी, कणकवलीत सेना-भाजप कार्यकर्त्यांचा राडा

    भाजप आमदार नितेश राणेंच्या जामीन अर्जावर आज पुन्हा कोर्टात सुनावणी होत आहे, मात्र मतदान संपल्यानंतर कणकवलीत भाजप आणि सेना कार्यकर्ते पुन्हा आमनेसामने आल्याचे दिसून आले. यावेळी दोन्हीकडील कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, शांतता राखण्यासाठी यावेळी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अजूनही कणकवलीत तणावाचे वातावरण आहे.


  • 29 Dec 2021 07:00 PM (IST)

    कोर्टातला युक्तिवाद संपल्यानंतर नितेश राणे यांचे वकील नारायण राणे यांच्या भेटीला

    सिंधुदुर्ग- कोर्टातला युक्तिवाद संपल्यानंतर नितेश राणे यांचे वकील नारायण राणे यांच्या भेटीला

    वकिलांचे पॅनल केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भेटणार

    संग्राम देसाई यांच्यासह इतर वकिलांचा पॅनल देणार नारायण राणे यांना कोर्टातील माहिती

  • 29 Dec 2021 05:52 PM (IST)

    नारायण राणे यांचे व्यस्त असल्याचे पोलिसांना पत्र

    मी दोन-तीन दिवस व्यस्त आहे, चौकशीला प्रत्यक्ष येऊ शकत नाही, तुम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जबाब नोंदवा असे पत्र नारायण राणे यांनी पोलिसांना पाठवले आहे.

  • 29 Dec 2021 05:47 PM (IST)

    नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या सुनावणी

    नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होणार आहे. आजच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने उद्याची तारीख दिली आहे. उद्या या जामीन अर्जावर निर्णय दिला जाणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे.

  • 29 Dec 2021 04:41 PM (IST)

    शाहू, फुले, आंबेडकरांचे नाव घ्यायचे आणि तालिबान्यांसारखे वागायचे-शेलार

  • 29 Dec 2021 04:34 PM (IST)

    राणेंना नोटीस, फडणवीस काय म्हणाले?

    राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राणेंना बजवलेल्या नोटीसीवर प्रतिक्रिया दिली आहे. राणेंच्या पाठिमागे भाजप खंबीरपणे उभे आहे, राज्यात पोलिसांना दरोडेखोर, बलात्काऱ्यांना पकडायला वेळ मिळत नाही. मात्र घरावरती जाऊन नोटिसा चिकटवतात हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सिंधुदुर्गमध्येही अनेक बेकायदेशीर धंदे सध्या आहेत, त्याकडे लक्ष द्यायला पोलिसांना वेळ नाही मात्र, राणेंच्या पाठिमागे लागायला वेळ आहे. असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

  • 29 Dec 2021 04:10 PM (IST)

    नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी सुरू

    नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचे फोटो एकत्र असल्याचे पुरावे कोर्टा समोर वकील घरत यांनी दाखवले

  • 29 Dec 2021 04:05 PM (IST)

    राणेंनी पोलिसांना सहकार्य करावे-संजय राऊत

    काय म्हणाले संजय राऊत?

    पोलीस नितेश राणेंना शोधत आहेत
    केंद्रीय मंत्री म्हणताय माहिती आहे पण सांगणार नाही
    हे कायद्याचे उल्लंघन
    आपण केंद्रीय मंत्री, पोलिसांना सहकार्य करा
    कायद्या पासून महत्वाची माहिती लपवू नका
    आपला मुलगा असेल तरी माहिती देणे गरजेचे
    अन्यथा आरोपींना पाठिशी घातलं म्हणून तुमच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो-राऊत

  • 29 Dec 2021 03:53 PM (IST)

    राणेंच्या घरावरील नोटीस राणेंच्या कर्मचाऱ्यांनी काढली

    पोलिसांनी नारायण राणेंच्या घरावर नोटीस लावली होती ती घरावरील नोटीस राणेंच्या कर्मचाऱ्यांनी काढली