बकरी ईदला परवानगी द्यायची नसेल तर दिवाळीचे कंदिल उतरवा. असं म्हणणाऱ्या उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे हयात असते तर गोळ्या घातल्या असत्या. असं विधान भाजपचे माजी मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणेंनी केलं आहे. मात्र राणेंनी दिलेलं उदाहरण ही धादांत फेक बातमी असल्याचं उत्तर सुषमा अंधारे यांनी दिलंय. मात्र नारायण राणेंचा दावा खरा आहे की खोटा., यासाठी आम्ही काही किवर्ड सर्च केले असता., नारायण राणेंनी दिलेल्या बातमीचा दाखला साफ खोटा असल्याचं समोर आलंय.
विशेष म्हणजे सोसायटींमध्ये सार्वजनिक कुर्बाणी नाही, तर दिवाळीत लाईटिंगही नको या शीर्षकाच्या बातमीची पोस्ट नारायण राणेंचे
पुत्र आणि भाजप आमदार नितेश राणेंनी शेअर केल्याचं दिसलं. जिहादी हृदयसम्राट म्हणून त्यावर नितेश राणेंनी कॅप्शनही दिलंय. दैनिक लोकवार्ताच्या नावानं ही बातमी पसरवण्यात आली. मुळात ही घटना तळोजातल्या एका सोसायटीतली होती. बातमीचं शीर्षक आणि आतला मजकूर यात प्रचंड तफावत आहे. त्यामुळे न्यूजचेकरनं उद्दव ठाकरे असं म्हणाल्याचा दावा स्पष्टपणे खोटा ठऱवून संबंधित बातमीला फेक ठरवलं आहे.
काल राज ठाकरेंनी देखील केलेला एक दावाही चर्चेत आलाय. मविआ काळात काँग्रेस-राष्ट्रवादीला घाबरुन उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढचं हिंदूहृदयसम्राट नाव काढून टाकलं असा राज ठाकरे म्हणाले. पण उद्धव ठाकरेंनी ते हटवण्याचे आदेश कुठे दिले नेमकं कुठून नाव हटवण्यात आलं. याचा तपशील अद्याप मिळालेला नाही.
शिवसेनेचं एक उर्दू कॅलेंडर प्रकाशित झालेलं होतं, गुगलवर उपलब्ध असलेल्या एका फोटोत बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढे जनाब नाव आहे. मात्र उर्दू किंवा मुस्लिम धर्मियांच्या अनेक कार्यक्रमात सर्वच पक्षांच्या नेत्यांच्या नावापुढे जनाब उल्लेख होतो. यावर तेव्हा ठाकरे गटात असणाऱ्या मनिषा कायंदेंनी केलेलं ट्विट व्हायरल झालंय., यात फडणवीस, शेलार, सोमय्यांच्या नावापुढे जनाब. तर भाजपच्या पूजन महाजनांच्या नावापुढे मोहतरमा पूनम महाजन असा उल्लेख आहे.
याशिवाय मुंबईत मविआ काळात बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याचं उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि मविआ नेत्यांच्या उपस्थितीत अनावरण झालं होतं. त्यावेळी बाळासाहेबांच्या नावाआधी असलेल्या हिंदूहृदयसम्राट नावाचा व्हिडीओ ठाकरे समर्थकांनी पोस्ट करुन मनसेला उत्तर दिलंय.
याआधी वक्फ बोर्डासंदर्भात दैनिक लोकमच्या नावानं प्रकाशित झालेल्या बातमीही वादात आली होती. त्या बातमीला सत्य मानून मनसे नेते प्रकाश महाजनांनी ठाकरे गटावर प्रहार केले होते., मात्र नंतर ती बातमी देखील फेक असून मॉर्फ करुन पसरवण्यात आल्याचं समोर आलं होतं.