पुणेः नागपूरची (Nagpur) मेट्रो वेगाने झाली आहे. आता पिंपरी, नागपूर-2, ठाणेसाठी मदत करा. त्यात काहीही राजकारण करणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना दिली. अजित पवार म्हणाले की, देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांचे महाराष्ट्राच्या शैक्षणिक, सांस्कृतिक राजधानी, ऐतिहासिक नगरीत मी मनापासून स्वागत करतो. मोदींच्या हस्ते आज महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे. अनेक वर्ष आपल्या सगळ्यांची इच्छा होती की, हे प्रकल्प पूर्ण व्हावेत. हे प्रकल्प पुणे-पिंपरीच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासात भर घालणारे आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहिले. त्यांचे पालकमंत्री या नात्याने आभार मानतो, असा उल्लेखही त्यांनी केला.
12 वर्षांची प्रतीक्षा…
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुणे करांच्या सहनशीलतेला खऱ्याअर्थाने दाद दिली पाहिजे. पुणे मेट्रोचे काम सुरू व्हायला 12 वर्षे लागली. मात्र, गडकरी साहेबांनी कठोर भूमिका घेतली. मेट्रो सुरू झाली. एक गोष्ट मान्य करावी लागले की, पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांना कामावेळी खूप त्रास सहन करावा लागला. अजूनही काही काळ हा त्रास सहन करावा लागेल. हे काम आणखी काही वर्ष सुरू राहणार आहे. एकंदर आज स्वतः पंतप्रधानांनी दहा आणि वीस रुपये तिकीट दर ठेवून सेवा सुरू केलीय, असा उल्लेखही त्यांनी केला.
मदतीचे आवाहन…
अजित पवार म्हणाले की, मोदींना एक सांगायचंय. अंधेरी-घाटकोपर मार्गावर पहिली मेट्रो सुरुवात केली. तिचे 2006 ला भूमिपूजन झाले. ती 2019 ला सुरू झाली. मात्र, अजूनही पिंपरी-स्वारगेट जसं सुरू आहे, तसं स्वारगेट ते कात्रज आणि हडपसर ते खराडी मार्गाचे आहे. या दोन मार्गिकेच्या अहवाल प्रकल्पाचं काम सुरू आहे. ते काम पूर्ण करून जसं आताच्या मेट्रोमध्ये 50 टक्के राज्य आणि 50 टक्के केंद आणि 10 टक्के भागिदारी महापालिकेची आहे. त्याच धर्तीवर मेट्रो सुरू करण्यासाठी मदत आपण केली. तशीच मदत आम्हालाही करावी, असे आवाहन त्यांनी केले.
गडकरींनाही साकडे…
अजित पवार म्हणाले की, आपल्यामुळे आणि गडकरी साहेबांमुळे नागपूर, मुंबई, पुणे, नाशिक मेट्रोसाठी मदत झाली पाहिजे. विकासाचा वेग वाढवण्यासाठी आपलं सहकार्य मिळावं. यात कोणतंही राजकारण न आणता सगळ्यांनी एकजुटीनं काम करावं. इतक्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मुळा मुठा नदी शुद्धीकरण प्रकल्प, जायका प्रकल्प आणि येणाऱ्या काळात सुशोभीकरणाचं काम होईल. आम्ही मोदींना विश्वास देतो की, मुळा-मुठा नदी शुद्धीकरण, जायका प्रकल्प, नदी पात्रातले पाण्याचे स्त्रोत, या सगळ्याचं भान ठेवावं लागणार आहे.
नाशिकचे संमेलन फक्त भुजबळांचे, पंचतारांकितच्या भपक्यात धोरणाचा बळी; ठाले-पाटलांचे ताशेरे
Nashik | घरांच्या किमती प्रति चौरस फूट 500 रुपयांनी महागणार; क्रेडाईचा निर्णय, कारण काय?