महाराष्ट्रात (Maharashtra ) ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 108 वर पोहोचली आहे. तर, शुक्रवारीसकाळपर्यंतच्या माहितीनुसार 42 रुग्ण ओमिक्रॉन संसर्गातून बरे झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्यासाठी राज्य सरकारनं दिलेली आणखी एक डेडलाईन संपली आहे. (ST Workers Strike) एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची कारवाई करण्याची शक्यता आहे. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज आणि उद्या सुट्टी असेल. भाजप ठाकरे सरकार विरोधात आक्रमक होताना दिसून येत आहे. (Maharashtra Vidhan Sabha Vidhan Parishad Winter Session Live ) महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती जाणून घ्या –
मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
वर्ष संपतंय. वर्ष संपण्यासोबत आता
कोरोनाचा नवा व्हेरीएट ओमिक्रॉनमुळ जगभरात संसर्ग वाढतोय.
देशातही रुग्णसंख्या वाढते आहे.
कुणीही घाबरु जायचं कारण नाही आहे.
सगळ्यांना सावध राहावं, सतर्क राहावं.
काळजी घ्यावी.
हात धुवत राहायला विसरायचं नाही आहे.
व्हायरस म्युटेट होत असल्यामुळे आपल्याला कोरोनाशी लढण्याची ताकदही वाढते आहे. त्यातही गुणाकार होतो आहे.
देशात आता १८ लाख आयसोलेशन बेड्स आहेत.
५ लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत.
१ लाख ४० हजार आयसीयू बेड्स आहेत.
देशात ३ हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत
४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत.
राज्यातला लागणारी बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत.
चाचण्यांची क्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
लसीकरण हे कोरोना संसर्गात महत्त्वाचं काम करत आहे. लसीकरणात भारतानं मैलाचा दगड पार केलाय.
पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाची राज्य असलेल्या गोवा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे.
लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनाही मान्यता मिळणार आहे.
राज्यातील काँग्रेसमध्ये मोठ्या बदल्यांची शक्यता वर्तवली जाते आहे. नितीन राऊत यांना काँग्रेससं एससी सेलमधूल हटवलं आहे. एक पत्रक जारी करत त्यांना काँग्रेस एससी विभागाच्या अध्यक्षपदावरुन मुक्त करण्यात आलं असून त्यांच्या जागी राजेश लिलोठिया यांना अध्यक्ष करण्यात आलं आहे. या बदलामुळे नितीन राऊत यांच्या नावाचं चर्चा ही विधानसभा अध्यक्षपदाच्या शर्यतीतही घेतली जाते आहे.
आदित्य ठाकरे
येत्या काळात पिंपरी-चिंचवड ,पुणे महापालिकेत शिवसेनेची ताकद दिसेल
आदित्य ठाकरेंनी महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकलं
सगळ्यांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा दिला सल्ला
आदित्य ठाकरेंकडून महापालिका निवडणुकीत युतीचे छुपे संकेत
राज्यातला विरोधी पक्ष कर्नाटकच्या घटनेवर चकार शब्द बोलत नाही
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी दूधाचा अभिषेक करून माफी मागावी
आदित्य ठाकरेंचा भाजपवर निशाणा !
पुणे महापालिका निवडणुकीसाठी कार्यकर्ता मेळावा
राजेश टोपे
आरोग्य भरतीच्या परिक्षेसंदर्भात पर्याय निवडण्याचं काम सुरु
परीक्षा परादर्शकपणे घेतली जाईल
पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे पुन्हा परीक्षा घ्यायला तयार आहे
राजेश टोपे
राज्यात 87 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण
ओमिक्रॉनचा प्रभाव दुपटीने होतोय
शाळा पूर्वीप्रमाणेच सुरु राहतील
जेव्हा 800 मेट्रिक टन ऑक्सिजन लागेल तेव्हा लॉकडाऊन लागेल
रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत जमावबंदी असेल
नागरिकांनी सतर्कता बाळगावी
नियम पाळून नववर्षाचं स्वागत करा
एकाचवेळी गर्दी होऊ नये हा निर्बंधामागचा उद्देश
शिर्डी साईदर्शनासाठी आज अलोट गर्दी…
ख्रिसमसच्या सुट्टया असल्याने भाविकांची गर्दी…
ओमिक्रॉनच्या पार्श्वभुमीवर अहमदनगर जिल्हयात नविन नियमावली लागु….
विविध आस्थापनांना नो वैक्सीन नो एंट्री ….
धार्मिक तिर्थस्थळांसाठी देखील नविन नियमावली लागु होण्याची शक्यता…
आज किंवा उद्या नियमावली जाहिर होण्याची शक्यता…
ख्रिसमसच्या सुट्टया तसेच नविन वर्षाच्या स्वागतासाठी होते गर्दी….
कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडुन विविध उपाययोजना….
– शहाण्यांना अधिक शहाणं करण्यासाठी ही संस्था काम करणार,
– यशदा या संस्थेमार्फत याआधी प्रशिक्षण दिले जात आहे,।
– नवीन नवीन गोष्ट देण्याकरिता राज्य सरकार पुढे राहिले पाहिजे,
– सारथीच्या इमारतीचे काम लवकरच सुरू करायचे आहे,मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यावर त्याचे भूमीपूजन केले जाणार
वाढत्या कोरोना पार्श्वभूमीवर केंद्र सतर्क
10 राज्यात केंद्र पथक पाठवणार
महाराष्ट्र राज्यासह केरळ, तामिळनाडू मध्ये केंद्राची पथक जाणार
3 ते 5 दिवस राज्यांचा आढावा घेतला जाणार
कर्नाटक, बिहार, यूपी मध्येही पथक जाणार
– महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उदघाटन सोहळा,
– उपमुख्यमंत्री अजित पवार, आदित्य ठाकरे, बाळासाहेब थोरात, उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती,
– मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन सहभागी
अनेक कार्यकर्त्यांना अटलजींचा सहवास मिळाला
आता त्या पैकी काही कार्यकर्ते आपल्या मध्ये नाही
महाराष्ट्रात अटल जी चा दौरा झाला होता तेव्हा मी त्यांच्या सोबत होतो
अटलजी ना मराठी नाटक खूप आवडायचं , हिंदी साहित्य वर त्यांचं अतूट प्रेम होतं
अविश्वरनिय व्यक्ती मत्व आजही आठवण केली जाते
अटलजी घरी आलेल्या प्रत्येकाला भेटत असे
नाशिक – भव्य बैलगाडा शर्यतीचे आयोजन
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पहिल्यांदाच होणार भव्य बैलगाडा स्पर्धा
राज्यभरातून बैलगाडा स्पर्धक होणार दाखल
अयोजकांकडुन बैलगाडा स्पर्धकांना कोरोना नियम पाळण्याच आवाहन
अटल बिहारी वाजपेयी हे उत्तम संसदपटू, माणुसकी काय असते, मानवता काय असते हे त्यांच्याकडून पाहिलं, देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांचं काम पाहता आलं, देशाचे नेतृत्त्व पक्षाचं नेतृत्त्व नव्हे, देशाचं नेतृत्त्व कसं असाव हा परिपाठ त्यांच्याकडून घेता आला. हिंदुत्त्वाच्या विचाराशी तडजोड न करता, हा देश सर्वांचा आहे. देशातील एकात्मता कायम टिकली पाहिजे याच्यावर भर देऊन राजकारण करणारे, धर्मांधता, जातीयता या दोन शब्दांना दूर ठेऊन राजकारण करता येतं हे अटलबिहारी वाजपेयी यांनी दाखवून दिलं.
शिवसेना आणि भाजपची युती झाली त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयींचं योगदान होतं. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना अनेक निर्णय घेण्यापूर्वी ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी चर्चा करत. आजचा भाजप पाहता अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांची आठवण येते.
काश्मीर प्रश्न शांततेच्या मार्गानं सोडवण्यासाठी प्रयत्न केले. लाहोरला बस घेऊन गेले, मुशर्रफ यांच्याशी चर्चा केली. मात्र, देशाच्या स्वाभिमानासाठी त्यांनी कारगील युद्धाचा मार्ग स्वीकारला, असं संजय राऊत म्हणाले. अटलबिहारी वाजपेयी हे देशाचे असे नेते आहेत त्यांचं स्मरण प्रत्येक जण करतो.
पंडित जवाहरलाल नेहरु यांच्यानंतर अटलबिहारी वाजपेयी लोकप्रिय नेते होते. पंडित नेहरु यांच्याकाळापासून अटलबिहारी वाजपेयी संसदेत होते. इंदिरा गांधी, राजीव गांधी असो अटलबिहारी वाजपेयींचा सन्मान करत होते. अटलबिहारी वाजपेयी कोणत्याही एका पक्षाचे नेते नव्हते, ते देशाचे नेते होते. सर्वांना सोबत घेऊन नेतृत्त्व केलं.
– अटलजीची जयंती आहे दीड लाख घरापर्यंत जाणार आहेत,
– मोदींच्या योजना प्रत्येक घरात सांगणार,
– अजित पवारांचा परखड पणा सगळीकडे चालणार नाही
– विलनिकरण का होणार नाही ते सांगावं
– सरकारी कर्मचाऱयांच्या समकक्ष त्यांना न्याव लागणार
– फोन टॅपिंग प्रकरणात योग्य वेळी देवेंद्र फडणवीस कोर्टासमोर जातील
– सरकार गेंड्याच्या कातडीशिवाय भयानक झालं आहे
– म्हाडा, आरोग्य टीईटी परीक्षेत भष्ट्राचार झाला आहे
– सगळ्यांचे धागेदोरे मंत्रालयापर्यंत गेले आहेत
– यामध्ये अनेक मंत्री अडकण्याची शक्यता, सीबीआय चौकशी नंतर समोर येईल
सातारा: फलटणमध्ये आणखी 2 जणांना ओमायक्रोनची लागण
प्रशासनाकडून विशेष खबरदारी म्हणून संशयित 2 जणांना विलगीकरण कक्षात केले होते दाखल….
दक्षिण आफ्रिकेतील युगांडा मधून आलेल्या 3 जणांना या आधी झाली होती ओमायक्रोनची लागण…
3 ओमायक्रोन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आणखी 2 जणांचा अहवाल आला पॉझिटिव
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे ओमायक्रोन ची रुग्ण संख्या झाली 5
सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांची माहिती
सोलापूर – मॅनहोल मध्ये झालेला चौघांचा मृत्यू प्रकरणी पालिका प्रशासन ढिम्म
पोलिसांनी दाखल केला महापालिका एमजीपी ,दास ऑफशोर , वज्र कंट्रक्शन वर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
प्राथमिक माहितीच्या आधारे सदोष मनुष्यवधाचा दाखल केला गुन्हा दाखल
अधिक तपासात संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर व्यक्तीशा जबाबदार धरून करण्यात येणार अटक
मॅनहोल मध्ये काम करताना चार कामगारांसोबत झाला आहे मृत्यू
एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल
– निफाडचा पारा पुन्हा घसरला….
– उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे निफाडच्या किमान तापमनात मोठी घसरण…..
– निफाड तालुक्यातील कुंदेवाडी येथील गहु संशोधन केंद्रावर 6.5 अंश सेल्सियस किमान तापमानाची या थंडीच्या हँगामतील निच्चांकी नोंद….
कोरोनाच्या संकटात ही महानगरपालिकेची 9 महिन्यात 102 कोटी रुपयांची कमाई..
महापालिकेच्या नगररचना विभागाने जमा केले ऐतिहासिक उत्पन्न..
कमी उत्पन्नाची अपेक्षा असताना 120 कोटी रुपयांचे उत्पन्न झाले प्राप्त..
यावर्षी गुंठेवारी नगररचना विभागाचा विक्रम आकडा..
मार्च अखेर पर्यंत 150 कोटी रुपये या विभागाकडून मिळतील असा अंदाज
एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनात एसटी बसेस अडविणारे 16 कर्मचारी बडतर्फ
या कर्मचाऱ्यांनी 30 नोव्हेंबर रोजी केलं आंदोलन दरम्यान बाहेर जाणाऱ्या बस अडवून त्यांची हवा काढली होती
त्याच प्रमाणे बस घडविल्या होत्या त्यांच्यावर गुन्हे सुद्धा दाखल करण्यात आले होते
त्यांना नोटीस देऊन उत्तर मागण्यात आले होते
मात्र उत्तर न दिल्याने बडतर्फ कारवाई करण्यात आली
काल नागपूर विभागातून धावल्या 16 बस
– कोरेगाव भीमा चौकशी आयोगाला पुन्हा सहा महिने मुदतवाढ,
– आयोगाचे कामकाज पूर्ण करण्यास व शासनास अंतिम अहवाल सादर करण्यासाठी ३० जून २०२२ पर्यंत मुदतवाढ,
– राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव प्र. ग. देशमुख यांची माहिती,
– आयोगास शासनाने याआधी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत मुदतवाढ दिली होती.
To carry out maintenance work of tracks, signalling and overhead equipment, a Jumbo Block of five hours will be taken on UP and DOWN Slow lines between Borivali and Goregaon from 10.35 hrs to 15.35 hrs on Sunday, 26th December, 2021.@drmbct pic.twitter.com/4vXENYFDwo
— Western Railway (@WesternRly) December 24, 2021