संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची दलाली करून शिवसेना संपवली, शिंदे गटाच्या नेत्यानं आरोप करत राऊत यांच्यावर केला हल्लाबोल

| Updated on: Jan 06, 2023 | 3:28 PM

नाशिकच्या ठाकरे गटातील आज पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी हल्लाबोल करत त्या पदाधिकाऱ्यांना मेंढरं म्हंटलं होतं. त्यावरून नरेश म्हस्के यांनी हल्लाबोल केला आहे.

संजय राऊत यांनी राष्ट्रवादीची दलाली करून शिवसेना संपवली, शिंदे गटाच्या नेत्यानं आरोप करत राऊत यांच्यावर केला हल्लाबोल
Image Credit source: Google
Follow us on

ठाणे : नाशिकमधील ठाकरे गटातील पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांनी बाळसाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला आहे. त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती. वेडेगबाळे लोक जात आहे, मेंढरं भरायची आणि पदाधिकारी यांनी प्रवेश केला सांगायचे असे दोन-चार दलाल इकडे तिकडे गेले तरी नाशिकची शिवसेना संपणार नाही असे संजय राऊत यांनी म्हंटले होते. त्यावर शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी जेलच्या बाहेर राहिलेले आमच्यासाठी महत्वाचे आहे. ते जितकं बोलत राहतील, तितके लोक आमच्याकडे येतील, राहिलेली ठाकरे सेना देखील संपवतील असेही म्हस्के यांनी म्हंटलं आहे. याशिवाय संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसची दलाली करून शिवसेना संपवली आहे असा टोला म्हस्के यांनी लावत नाशिकमधील विधानसभा प्रमुख, शहर पदाधिकारी, शाखा पदाधिकारी हे काही मेंढरं नाही, त्यांची ऊब आमच्या पक्षाला मिळाली आहे आणि त्यांची आम्हाला गरज असल्याचंही म्हस्के यांनी म्हंटले आहे.

नाशिकच्या ठाकरे गटातील आज पन्नासहून अधिक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यावरून संजय राऊत यांनी हल्लाबोल करत त्या पदाधिकाऱ्यांना मेंढरं म्हंटलं होतं.

हे सुद्धा वाचा

संजय राऊत यांनी यापूर्वी शिंदे गटात गेलेल्या नगरसेवकांना दलाल आणि ठेकेदार म्हंटले होते, त्यावरूनही संजय राऊत यांनी शिंदे गटाला टोला लगावला होता.

त्यावर नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार करत थेट राष्ट्रवादीचा दलाल म्हंटले आहे, याशिवाय नाशिकचे आणखी पदाधिकारी प्रवेश करणार असल्याचे म्हंटले आहे.

याशिवाय डॅमेज कंट्रोल करण्यासाठी ठाकरे गटाचे एक खासदार आधीच नाशिकला असतांना आणि दुसरे खासदार जाणार असतांनाही ठाकरे गटाला हा धक्का दिल्याने त्यांना जिव्हारी लागल्याचे म्हस्के यांनी म्हंटलं आहे.