नाशिकः नाशिक जिल्ह्यात कोरोना (Corona) रुग्णांची अतिशय झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सद्यस्थितीत 14 हजार 103 रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील 4 लाख 16 हजार 202 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 773 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
असे आहेत रुग्ण
उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक580, बागलाण 122, चांदवड 128, देवळा 113, दिंडोरी 285, इगतपुरी 235, कळवण 102, मालेगाव 120, नांदगाव 166, निफाड 694, पेठ 43, सिन्नर 362, सुरगाणा 52, त्र्यंबकेश्वर 171, येवला 197 असे एकूण 3 हजार 370 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 10 हजार 169, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 291 तर जिल्ह्याबाहेरील 273 रुग्ण असून असे एकूण 14 हजार 103 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 39 हजार 078 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या रुग्णांमध्ये नाशिक 135, बागलाण 31, चांदवड 32, देवळा 31, दिंडोरी 61, इगतपुरी 38, कळवण 50, मालेगाव 19, नांदगाव 52, निफाड 206, पेठ 10, सिन्नर 104, सुरगाणा 20, त्र्यंबकेश्वर 40, येवला 39 असे एकूण 868 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 95.37 टक्के, नाशिक शहरात 94.33 टक्के, मालेगावमध्ये 95.09 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 94.41 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.79 इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 254 रुग्णांचा आतापर्यंत कोरोनाने मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 35, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 773 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज गुरुवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार सद्यस्थितीत 14 हजार 103 रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील 4 लाख 16 हजार 202 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 773 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– डॉ. अनंतर पवार, जिल्हा नोडल अधिकारी
जिल्ह्याचे आजचे चित्र
– 4 लाख 39 हजार 078 एकूण कोरोनाबाधित.
– 4 लाख 16 हजार202 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 14 हजार 103 पॉझिटिव्ह रुग्ण.
– जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 94.79 टक्के.
Nashik Water | नाशिकमध्ये आज पाणी नाही, पंपिंग स्टेशनमध्ये दुरुस्ती; कधी सुरळीत होणार पुरवठा?
Nashik | डाव्या चळवळीला धक्का; ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक कॉम्रेड नामदेवराव गोडसे यांचे निधन