नाशिकः नाशिकमध्ये कोरोनाच्या (Corona) रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या नाशिक महापालिका, निफाड, नांदगाव, दिंडोरीत तालुक्यात मोठ्या प्रमाणात बाधित सापडत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 13 हजार 169 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 11 हजार 551 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 770 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
यांच्यावर उपचार सुरू
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांत नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 327, बागलाण 58, चांदवड 65, देवळा 37, दिंडोरी 167, इगतपुरी 139, कळवण 66, मालेगाव 63, नांदगाव 219, निफाड 451, पेठ 19, सिन्नर 254, सुरगाणा 26, त्र्यंबकेश्वर 59, येवला 95 असे एकूण 2 हजार 45 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 8 हजार 962, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 223 तर जिल्ह्याबाहेरील 321 रुग्ण असून असे एकूण 11 हजार 551 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 33 हजार 409 रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 58, बागलाण 10, चांदवड 20, देवळा 5, दिंडोरी 27, इगतपुरी 15, कळवण 4, मालेगाव 11, नांदगाव 29, निफाड 69, पेठ 1, सिन्नर 57, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 14, येवला 18 असे एकूण 339 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.13 टक्के, नाशिक शहरात 94.73 टक्के, मालेगावमध्ये 95.56 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 93.55 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 95.32 टक्के इतके आहे. दरम्यान, नाशिक ग्रामीणमध्ये आजपर्यंत 4 हजार 253, तर नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 33 जणांचा मृत्यू झाला आहे. मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 779 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 13 हजार 169 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 11 हजार 551 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
-डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी
नाशिक जिल्हा ठळक…
– नाशिक जिल्ह्यात एकूण 4 लाख 33 हजार 490 कोरोनाबाधित.
– एकूण रुग्णांपैकी 4 लाख 13 हजार 169 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 11 हजार 551 पॉझिटिव्ह रुग्ण.
– नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 95.31 टक्के आहे.
Nashik | आजपासून कडक हेल्मेटसक्ती; पहिल्यांदा पाचशेचा दंड, दुसऱ्यांदा खोड मोडणारी कारवाई होणार