नाशिकः नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 10 हजार 688 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 9 हजार 298 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील सध्याचे रुग्ण
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 114, बागलाण 34, चांदवड 19, देवळा 16, दिंडोरी 131, इगतपुरी 55, कळवण 50, मालेगाव 43, नांदगाव 130, निफाड 434, पेठ 4, सिन्नर 112, सुरगाणा 20, त्र्यंबकेश्वर 21, येवला 29 असे एकूण 1 हजार 212 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 7 हजार 535, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 182 तर जिल्ह्याबाहेरील 369 रुग्ण असून असे एकूण 9 हजार 298 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 28 हजार 753 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 70, बागलाण 15, चांदवड 12, देवळा 5, दिंडोरी 33, इगतपुरी 18, कळवण 11, मालेगाव 8, नांदगाव 23, निफाड 108, सिन्नर 42, सुरगाणा 3, त्र्यंबकेश्वर 6, येवला 13 असे एकूण 367 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.61 टक्के, नाशिक शहरात 95.26 टक्के, मालेगावमध्ये 95,84 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 92.64 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 96.79 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आजपर्यंत कोरोनाने 4 हजार 252 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 31, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील 4 लाख 10 हजार 688 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 9 हजार 298 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 767 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– डॉ. अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी
नाशिक जिल्ह्याचे चित्र
– एकूण बाधित 4 लाख 28 हजार 753.
– 4 लाख 10 हजार 688 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने डिस्चार्ज.
– सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले 9 हजार 298 पॉझिटिव्ह रुग्ण.
– नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 7 हजार 535 रुग्ण.
– मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 182 रुग्ण.
– जिल्ह्याबाहेरील 369 रुग्ण
– जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.79 टक्के.
Nashik | नाशिक बाजार समितीत 500 कोटींचा घोटाळा; भाजपची ‘ईडी’कडे तक्रार, प्रकरण काय?
Nashik | 127 किमी वेगाने दुचाकी झाडावर आदळली; 2 मित्र 30 फूट खोल खड्ड्यात पडून गतप्राण
Nashik | थाप मारून थापाड्या गेला, मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत नणंद-भावजयीला 43 लाखांना फसवले