नाशिकः नाशिकमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा झपाट्याने वाढत आहेत. आजघडीला तब्बल 638 रुग्णांवर उपचार सुरू आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 4 हजार 706 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 756 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली.
येथे आहेत रुग्ण
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 34, बागलाण 15, चांदवड 6, देवळा 18, दिंडोरी 38, इगतपुरी 8, मालेगाव 2, नांदगाव 4, निफाड 49, सिन्नर 19, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 3, येवला 15 अशा एकूण 212 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 407, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 8 तर जिल्ह्याबाहेरील 11 रुग्ण असून, असे एकूण 638 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 14 हजार 100 रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचे वाढलेले रुग्ण पाहता नाशिकमध्ये आता सर्व सार्वजनिक ठिकाणी 5 पेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यावर रात्री 9 ते सकाळी 6 यावेळेत बंदी असेल. त्यामुळे कसल्याही पार्ट्या होणार नाहीत. लग्न समारंभासाठी बंदिस्त सभागृहांमध्ये एकावेळी उपस्थितांची संख्या ही घटवण्यात आली आहे. मात्र, या नियमांचे पालन होताना दिसत नाही. त्यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. शिवाय गेल्या आठ दिवसांत 9 जणांचे मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे.
नियमांची पायमल्ली
नाशिकमध्ये ‘शिवसेना मनामनात शिवबंधन घराघरात’ हा कार्यक्रम काल पार पडला. या कार्यक्रमाला संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मात्र, यावेळी कोरोना प्रतिबंधक नियमांची पायमल्ली करण्यात आली. नाशिकमध्ये नुकतेच दोन शाही विवाह सोहळे झाले. यात जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या मुलीचा एक विवाह सोहळा होता. या सोहळ्याला खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. तर दुसरीककडे कन्नडचे आमदार उदयसिंग राजपूत यांच्या मुलाचा नाशिकमध्येच बालाजी लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात विवाह सोहळा पार पडला. या विवाह सोहळ्याला मंत्री एकनाथ शिंदे, आमदार अब्दुल सत्तार, शिवसेना नेते संजय राऊत, दादा भुसे यांनी हजेरी लावली. या दोन्ही लग्नाला हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळीही कोरोनाच्या नियमांचेही उल्लंघन झाले. यामुळे रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.
8 दिवसांतील मृत्यू
-23 डिसेंबर 2021-01
-26 डिसेंबर 2021-01
-27 डिसेंबर 2021-02
-28 डिसेंबर 2021-02
-29 डिसेंबर 2021-02
-31 डिसेंबर 2021-01
अस्पृश्यता निवारणाचे शिलेदार महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या अफाट कार्याचे स्मृतिदिनी स्मरण!
Nashik|पाचवीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; महिन्यातील दुसरी घटना, नेमके कारण काय?