नाशिकः नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 569 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 4 हजार465 रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह रुग्ण
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 159, बागलाण29, चांदवड 22, देवळा 16, दिंडोरी 124, इगतपुरी 53, कळवण 25, मालेगाव 12, नांदगाव 45, निफाड 221, सिन्नर 84, सुरगाणा 5, त्र्यंबकेश्वर 15, येवला 13 असे एकूण 822 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 32, बागलाण 7, चांदवड 7, देवळा 1, दिंडोरी 14, इगतपुरी 13, कळवण 5, मालेगाव 1, नांदगाव 18, निफाड 40, सिन्नर 23, त्र्यंबकेश्वर 7, येवला 1 असे एकूण 169 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 3 हजार 459, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 27, तर जिल्ह्याबाहेरील157 रुग्ण असून असे एकूण 4 हजार 465 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 18 हजार 797 रुग्ण आढळून आले आहेत.
अधिकाऱ्यांनी घेतला बूस्टर डोस
नाशिकमध्ये आजपासून बूस्टर डोसला सुरुवात करण्यात आली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांना पहिला बूस्टर डोस देण्यात आला. दरम्यान बूस्टर डोस व्यतिरिक्त ज्या लोकांचे पहिले आणि दुसरे डोसा राहिले असतील, त्यांनी तात्काळ घ्यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांनी केले आहे.
45 हजार हेल्थ वर्कर्सना देणार डोस
नाशिक जिल्ह्यात सोमवारपासून 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस द्यायला सुरुवात करण्यात आली. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये नऊ महिन्यांचे अंतर बंधनकारक आहे. 10 एप्रिल 2021 पू्र्वी डोस घेतलेले असे 45 हजार हेल्थ वर्कर्स या मोहिमेसाठी पात्र असणार आहेत. त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शिवाय नागरिकांच्या लसीकरणालाही गती देण्यात येणार आहे.
Gold Price| आली लगीन सराई, करा स्वस्तातले सोने खरेदीची घाई, जाणून घ्या राज्यातले दर…!
Nashik new corona restrictions| आजपासून नवे निर्बंध; 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस