नाशिकः अतिशय धक्कादायक बातमी. नाशिकमध्ये कोरोनाची संख्या अतिशय झपाट्याने वाढत असून, जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 5 हजार 309 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, दुसरीकडे सध्या 2 हजार 566 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
येथे वाढले रुग्ण
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 107, बागलाण 17, चांदवड 14, देवळा 14, दिंडोरी 73, इगतपुरी 24, कळवण 16, मालेगाव 9, नांदगाव 22, निफाड 129, सिन्नर 43, सुरगाणा 4, त्र्यंबकेश्वर 9, येवला 9 असे एकूण 490 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 969, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 23 तर जिल्ह्याबाहेरील 84 रुग्ण असून असे एकूण 2 हजार 566 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 16 हजार 638 रुग्ण आढळून आले आहेत. नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 44, बागलाण 8, चांदवड 5, देवळा 2, दिंडोरी 19, इगतपुरी 11, कळवण 7, मालेगाव 3, नांदगाव 5, निफाड 47, सिन्नर 13, सुरगाणा 2, त्र्यंबकेश्वर 4, येवला 3 असे एकूण 173 पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 97.01 टक्के, नाशिक शहरात 97.45 टक्के, मालेगावमध्ये 97.01 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 96.61 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.38 टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीणमध्ये आतापर्यंत 4 हजार 250 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 29, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 358 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8हजार 763 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर कडक कारवाई
ज्या नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. तो वेळेत घ्यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसांत वाढलेली रुग्णसंख्या पाहता लग्नसमारंभ साधेपणाने करावे. समांरभामध्ये 50 पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास महसूल व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत संयुक्तपणे संबंधित आयोजकांवर कडक कारवाई करावी. नागरिकांनी लसीकरण वेळेत करून घ्यावे.वअन्यथा वेळेत लसीकरण न झाल्यास ‘नो व्हॅक्सिनेशन, नो रेशन’ असा कटू निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व यात्रांवर बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळांमध्ये कोरोनाच्या सर्वं नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तेथील पुजारी, विश्वस्त यांची असेल. सर्व शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, याबाबतची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करावी असे आदेश दिले आहेत.
Video| पुन्हा अवकाळी तडाखा, शेतकऱ्यांना हुंदके अनावर; उत्तर महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भाला इशारा
Nashik| सामाजिक कार्यकर्त्या, महिला हक्क संरक्षण समितीच्या माजी अध्यक्ष साधना तोरणे यांचे निधन
Nashik Crime|भयंकर आक्रीत, चौथीतल्या मुलीला जंगलात फाशी देण्याचा प्रयत्न; पंचक्रोशीत खळबळ!