Nashik| मनुष्यबळाचे विवरणपत्र सादर करण्याचे आदेश; कशी कराल प्रक्रिया पूर्ण?

| Updated on: Jan 04, 2022 | 3:27 PM

अंगीकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका यांना विवरणपत्रे सादर करावी लागणार आहेत.

Nashik| मनुष्यबळाचे विवरणपत्र सादर करण्याचे आदेश; कशी कराल प्रक्रिया पूर्ण?
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नाशिकः  नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी डिसेंबर 2021 अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 हे 30 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावे, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे.

या संस्थांना सक्ती

सेवायोजन कार्यालये रिक्तपदांची सूचना देणे सक्तीचे कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदीनुसार सर्व आस्थापनांना मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र सादर करावे लागणार आहे. यामध्ये विशेषतः अंगीकृत उद्योग, व्यवसाय, महामंडळे, स्थानिक स्वराज संस्था, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका, नगरपालिका तसेच व्यापार खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात, अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यवसाय कारखाने यांचा समावेश करण्यात आला आहे. या संस्थांनी वेळेच्या आत विवरणपत्रे सादर करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

कसे सादर कराल?

आस्थापनांनी वेतनपटावर असलेल्या सर्व मनुष्यबळांची माहिती ई-आर-1 विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर माहे डिसेंबर तिमाही संपल्यानंतर 30 दिवसांच्या आत विवरणपत्र सादर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 संकेतस्थळावर सादर करतांना दिलेल्या लीस्ट ‘अ’ मधील जॉब या पर्यायावर क्लिक करून एम्प्लॉयर लॉग इनमध्ये युजर आयडी व पासवर्ड च्या आधारे लॉगइन करून ईआर रिपोर्ट मधील ई-आर 1 या पर्यायावर क्लिक करून माहिती सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी…

विवरणपत्र सादर करण्याबाबत काही तांत्रिक अडचण आल्यास कार्यालयीन वेळेत सकाळी 09.45 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत (0253)-2972121 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन सहायक आयुक्त अनिसा तडवी यांनी केले आहे. मात्र, संबंधित कालावधित ही प्रक्रिया पूर्ण करावे, अशा सूचनाही सर्व उद्योग आणि इतर संस्थांना दिल्या आहेत.

सेवायोजन कार्यालये रिक्तपदांची सूचना देणे सक्तीचे कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदीनुसार सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनच्या सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांनी डिसेंबर 2021 अखेरचे मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर-1 हे 30 जानेवारी 2022 पर्यंत सादर करावे.
– अनिसा तडवी, सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग

इतर बातम्याः

Nashik| लासलगावसह 16 गावांचा पाणीप्रश्न मार्गी; भुजबळांच्या प्रयत्नातून 17 कोटी 54 लाखांचा निधी मंजूर

Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 59 अर्ज; कशी रंगलीय निवडणूक?

Nashik Corona|नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा धडाका; तर वाढत्या संसर्गाने पुन्हा धडकी