Video | दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, नाशिकमध्ये गोदा घाट परिसरात काय स्थिती?

Video | दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी, नाशिकमध्ये गोदा घाट परिसरात काय स्थिती?

| Updated on: Sep 16, 2022 | 1:26 PM

नांदूर मधमेश्वर धरणातून 36 हजार 731 क्यूसेक पाण्याचा गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग करण्यात येत आहे यामुळे गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नाशिकः गणेशोत्सवानंतर नाशिकमध्ये वरुण राजाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. नाशिकमधील पूरस्थितीचा अंदाज दर्शवणाऱ्या दुतोंड्या मारुतीकडे (Dutondya Maruti) सर्वांचं लक्ष आहे. सध्या शहरातील गोदा घाट (Goda Ghat) परिसरातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी आलंय. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी (Igatpuri), त्रंबकेश्वर, दिंडोरी आणि नाशिक या तालुक्यांमध्ये पावसाची कधी संततधार तर कधी जोरदार बॅटिंग सुरु असल्याने गंगापूर, दारणा, पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने गोदावरी ,दारणा कादवा नद्यांचे पुराचे पाणी नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल झाले आहे. नांदूर मधमेश्वर धरणातून 36 हजार 731 क्यूसेक पाण्याचा गोदावरी नदीतून जायकवाडीच्या दिशेने विसर्ग करण्यात येत आहे यामुळे गोदावरी नदी काठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Published on: Sep 16, 2022 01:25 PM