नाशिकः गोदातीरावर वसलेल्या रम्य अशा नगरीतल्या नागरिकांना आत्ताच सावध करण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण नाशिकचा ध्वनीप्रदूषणाच्या बाबतीत राज्यातील टॉप 10 शहरामध्ये समावेश झाला आहे. त्यामुळे साऱ्यांचीच चिंता वाढली आहे. राज्य प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडून एक यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार नाशिकमध्ये दिवसा 75.2 डेसीबल, तर रात्री 68.2 डेसीबलपर्यंत ध्वनी प्रदूषण होत आहे. हे ध्वनी प्रदूषण सुरक्षा मानक मर्यादेच्या पातळीपलीकडे जात आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तात्काळ याची दखल घ्यावी, अन्यथा हा धोका वाढू शकतो, अशी मागणी पर्यावरण प्रेमी करत आहेत.
ध्वनीप्रदूषणात का झालीय वाढ?
चालू वर्षी 21 आणि 22 फेब्रुवारीदरम्यान ही ध्वनीप्रदूषणाची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या काळात फटाके वगैरे जास्त वाजवण्यासाठी दिवाळीही नव्हती. नाशिक शहरामधील तरुणाला आवाजाचे वेड लागल्याचे निरीक्षण पर्यावरणप्रेमी नोंदवत आहेत. अनेक तरुण दुचाकीच्या सायलेंसरमध्ये तांत्रिक बदल करून तिचा आवाज वाढवतात. शिवाय अनेक जण मोठमोठ्या आवाजात गाणे लावतात. लग्न, सोहळे, समारंभ यातही सर्रास ध्वनीप्रदूषण केले जाते. हे आता धोकादायक पातळीवर पोहचले आहे. अनेक कार्यक्रमात हा आवाज 100 ते 120 डेसिबलपर्यंत जातो. काही कार्यक्रम राजकीय नेत्यांचे, बड्या असामींचे असतात. तक्रार करूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळे या प्रदूषणात वाढ झालेली दिसत असून, याचा फटका ज्येष्ठ, तरुण आणि लहान मुले या साऱ्यांनाच बसणार आहे.
हवाही होतेय रोगट
नाशिकमध्ये ध्वनीप्रदूषणासोबतच हवेच्या प्रदूषणातही वाढ होतेय. उद्योगनगरी ही नाशकची ख्याती. त्यात वाढती वाहने. त्यामुळे हवेचा स्तरही जास्त प्रदूषित होतोय. विशेष म्हणजे आज मंगळवारची तासाभरातली नोंद पाहिली तर संवेदनशील लोकांना आरोग्यावर त्वरित परिणाम जाणवू शकणारे हवा प्रदूषण आहे. प्रदीर्घ काळ संपर्कात राहिल्यास निरोगी लोकांनाही किरकोळ ते मध्यम लक्षणे अनुभवायला येतील. या वातावरणात छोटे घन व द्रव कण हे 10 मायक्रोमीटर्सहून कमी व्यास असलेले हुंगले जाणारे प्रदूषणकारक कण असतात. 2.5 मायक्रोमीटर्सहून मोठे कण श्वसनमार्गात जमा होऊ शकतात. ज्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. संसर्गामुळे डोळे आणि घशाचा दाह, खोकला किंवा श्वास घेण्यात अडचण आणि वाढलेला दमा हे परिणाम होऊ शकतात. अधिक वारंवार आणि अति प्रमाणातील संसर्गामुळे आरोग्यावर अधिक गंभीर परिणाम होऊ शकतात.
Health Care : फळे खाल्ल्यानंतर लगेचच पाणी पिणे आरोग्यासाठी धोकादायक, वाचा अधिक!https://t.co/utzB0ZkKLN | #Healthcare | #Water | #dangerous | #Healthcaretips | #lifestyle |
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2021
इतर बातम्याः
साहित्य संमेलनात राजकीय राबता, समारोपाला पवार, मुख्यमंत्रीही लावणार हजेरी; उद्घाटक मात्र ठरेना!