नाशिकः अवघ्या पावणेदोन तासात नाशिकहून थेट पुण्याला (Nashik) पोहचते करणाऱ्या नाशिक-पुणे (Pune) सेमी हायस्पीड रेल्वे (railway) प्रकल्पाचे काम सध्या सुसाट सुरू आहे. या प्रकल्पासाठीच्या मार्गिका मोजण्याच्या कामाने सध्या गती पकडली असून, आतापर्यंत तब्बल 101 गावांपैकी 64 गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले. (Nashik-Pune now in two and a half hours, semi high speed railway work is fast, counting of 64 villages is completed)
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड हा राज्य सरकारच्या महत्त्वांक्षी प्रकल्पांपैकी एक असल्याने त्याला गती देण्यात आली आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर नाशिक, पुणे, नगर या जिल्ह्यांतून सेमी हायस्पीड रेल्वे जाणार आहे. त्यासाठी नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातील 1 हजार 470 हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. शेतकऱ्यांशी विचार विनयम करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच या जमिनीचे संपादन केले जाणार आहे. त्यांना योग्य तो मोबदलाही देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या भूसंपादनाबाबत रेल्वे विभागाने प्रस्ताव दाखल केले आहेत.
येथे होणार भूसंपादन
भूसंपादनाबाबत रेल्वे विभागाने दाखल केलेल्या प्रस्तावर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा मार्ग पुणे जिल्ह्यातील हवेली, खेड, जुन्नर आणि आंबेगाव या चार तालुक्यांतून जाणार आहे. त्यासाठी 575 हेक्टर भूसंपादन केले जाणार आहे. नाशिक आणि नगर जिल्ह्यातही भूसंपादन केले जाणार आहे. या कामासाठी जवळपास 1500 कोटींच्या निधींची गरज आहे.
टेक्निकल सर्वेक्षण पूर्ण
या प्रकल्पासाठीच्या मार्गिका मोजण्याचे काम सध्या वेगात सुरू आहे. आतापर्यंत तब्बल 101 गावांपैकी 64 गावातील मोजणीचे काम पूर्ण झाले. 4500 सर्व्हे नंबरपैकी 1000 सर्व्हे नंबरच्या सर्च रिपोर्टचे, तर 45 टक्के जिओ टेक्निकल सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले आहे. दरम्यान या मार्गाच्या कामाचा नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा घेतला. सध्या 64 गावांती मोजणी पूर्ण झाली आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य रेल कॉर्पोरेशनने या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्र्यांना दिली.
असा आहे प्रकल्प
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासाठी एकूण 235 किलोमीटर लांबीचा लोहमार्ग टाकण्यात येणार आहे. नाशिक, नगर, पुणे जिल्ह्यात हा मार्ग जाणार आहे. या मार्गावर एकूण 24 स्थानके असणार आहेत. या मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर फक्त पावणेदोन तासांत काटले जाणार असून, ही रेल्वे प्रतितास 200 किलोमीटर वेगाने धावणार आहे.
शेतकऱ्यांचा विरोध
नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांनी विरोधही केला आहे. वाकी बुद्रुकमधून सेमी हाय स्पीड रेल्वेला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. भूसंपादन करत असताना कुक्कुटपालन प्रकल्प ,घर, ओटा, बोअर वेल, कांद्याची चाळ, विहिरी व इतर अनेक स्वरूपात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या हाय स्पीड रेल्वेच्या भूसंपदानाला विरोध केला आहे. (Nashik-Pune now in two and a half hours, semi high speed railway work is fast, counting of 64 villages is completed)
इतर बातम्याः
Nashik weather:नाशिक जिल्ह्यात आज जोरदार, खान्देशमध्येही लावणार हजेरी
NashikFlood:वालदेवीला पूर, एक जण गेला वाहून, गोदाकाठच्या नागरिकांना दक्षतेचा इशारा