नाशिकः नाशिकचे (Nashik) हवामान पोषक राहण्यासाठी महानगरपालिका (Municipal Corporation) व वर्ल्ड रिर्सोस इन्सिट्यूट यांच्यामध्ये नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅनच्या (Climate Action Plan) सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. तसेच शहरांचा विकास आराखडा करताना स्थानिक नागरिक, तज्ज्ञ व्यक्ती व स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग घेतल्यास निसर्गाची कमीत कमी हानी करून पर्यावरण पूरक शाश्वत विकास साधावा, असे आवाहन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केले आहे. बोट क्लब येथे आयोजित नाशिक जिह्याची पर्यटन विषयक आढावा बैठकीत आदित्य ठाकरे बोलत होते. यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पर्यटन संचालनालय मुंबईचे संचालक मिलिंद बोरीकर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण, महानगरपालिका उपायुक्त मनोज घोडे – पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, महानगरपालिकेचे इतर अधिकारी उपस्थित होते.
सौरऊर्जा प्रकल्प
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, शुद्ध हवा आणि पाणी तसेच नागरिकांना चांगले जीवन देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन पर्यावरण पूरक विकासाची कास धरणे आवश्यक आहे. यासाठी सर्व यंत्रणांनी समान पातळीवर येवून काम करणे आवश्यक आहे. तसेच महानगरपालिकेमार्फत सौरऊर्जा हा चांगला प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पाची नागरिकांना माहिती दिल्यास शहरातील विजेचा मोठा प्रश्न सुटणार आहे. जिल्ह्यातील महापालिकेमार्फत जीआयएस मॅपिंग करण्यात येत आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व झाडांची त्यांच्या माहिती आणि त्यांच्या प्रकारासह या मॅपिंगमध्ये समावेश करण्यात यावा. जेणेकरून त्यांची नोंद घेणे सोयीचे होणार आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील जमिनीखालील पाईपलाईन व सांडपाण्याचे गटार यांचाही सर्वे करून या बाबींचा समावेश देखील या मॅपिंग मध्ये करावा जेणेकरून नवीन विकास आराखडा तयार करतांना नोंदी उपलब्ध होणार आहे. अशा सूचना यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिल्या आहेत.
नाशिकला सर्वोतोपरी मदत
शहरीकरणाचा विकास करताना पर्यावरण व निसर्गाच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. राज्यात पर्यटनाचा विकास होत आहे हा विकास करतांना सर्वांनी एकत्रितरीत्या येवून काम केल्यास पर्यावरणाचा समतोल साधता येणार आहे. यासाठी नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सर्वोत्तपरीने मदत करण्यात येईल, असे प्रतिपादन नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यावेळी शिंदे म्हणाले की, ग्लोबल वार्मिंग व वातावरणीय बदलांचा अभ्यास करून विकासाचा आराखडा तयार करून शहरीकरणाचा विकास करणे आवश्यक आहे. विकासात्मक शहरीकरणाचा आराखडा तयार करतांना मूलभूत सोई सुविधांचा विचार आणि पर्यावरणाचा करून आराखडा तयार करावा.
प्रकल्पांचे सादरीकरण
महानगरपालिकेने सुरक्षित व सुंदर शहर निर्मितीसाठी स्पर्धेचे आयोजन केल्यास जलद गतीने जिल्ह्याचा विकास होणार आहे. शहरीकरण करतांना पुलांचे बांधकाम करतांना झाडांचे नुकसान होणार नाही याची महापालिकेने दक्षता घ्यावी, असेही नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले आहे. महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांनी यावेळी नाशिक शहराच्या महत्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती सादरीकरणाद्वारे दिली.
Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?
Nashik Corona | नाशिकमध्ये किशोरवयीन मुलांची लसीकरणाकडे पाठ, 3 आठवड्यात फक्त अर्धेच टार्गेट पूर्ण!