Nashik Tourism| त्र्यंबकचरणी भक्तांचा कल्लोळ…नाशिकमध्ये पर्यटकांचा बहर; सारे रिसॉर्ट फुल्ल….!

| Updated on: Dec 27, 2021 | 4:22 PM

नाशिकजवळील गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोट क्लब उभारण्यात आले आहे. या बोट क्लबमध्येही सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे.

Nashik Tourism| त्र्यंबकचरणी भक्तांचा कल्लोळ...नाशिकमध्ये पर्यटकांचा बहर; सारे रिसॉर्ट फुल्ल....!
त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या आहेत.
Follow us on

नाशिकः सलग आलेल्या सुट्टा, वर्षाचा शेवट आणि नाताळचा सण या साऱ्याचे गणित जुळून आले आहे. त्र्यंबकश्वरमध्ये भक्तांच्या कल्लोळ दाटला आहे, तर नाशिकमध्येही पर्यटकांची मांदियाळी दाटलेली दिसून येतय. त्यामुळे व्यापारी समाधान व्यक्त करत आहेत. मात्र, ओमिक्रॉनच्या धास्तीमुळे प्रशासनाची धडधड वाढली आहे.

भाविकांचा उत्साह…

नाशिकपासून अवघ्या 28 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर मंदिर आहे. गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे. या मंदिराचे सारे व्यवस्थापन त्र्यंबकेश्वर मंदिर ट्रस्टकडून केले जाते. येथे येणाऱ्या भाविकांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध आहे. सध्या येथे भक्तांचा महापूर दाटला आहे. भाविक त्र्यंबक, वणी आणि नाशिकमधल्या रामकुंड परिसरात गर्दी करत आहेत. देशभरातून आलेले पर्यटक आणि भक्तांनी नाशिक जिल्हा सध्या तरी फुलून गेला आहे. त्र्यंबकेश्वर परिसरातील बहुतांश रिसॉर्ट फुल्ल झाले आहेत. अनेकांनी नाशिकमध्ये आपला मुक्काम ठोकला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाने व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले होते. मात्र, या वर्षी त्यांना ही गर्दी पाहता दिलासा मिळाल्याचे दिसत आहे.

फ्लॉवर पार्कचे आकर्षण

देशातले पहिले फ्लॉवर पार्क नाशिकमध्ये साकारले आहे. खरे तर नाशिकचे 1200 ते 1300 च्या दशकातील नाव म्हणजे गुलशनाबाद. कधीकाळी सुंदर आणि रंगीबेरंगी फुलांनी झाकलेले शहर म्हणून नाशिक प्रसिद्ध होते. मात्र, काळाच्या ओघात शहरीकरण वाढले आणि नाशिकची ही ओळख नाहीशी झाली. मात्र, फॉरेनच्या धर्तीवर उभारण्यात आलेल्या फ्लॉवर पार्कमुळे नाशिकला पुन्हा एकदा गुलशनाबादचे पुनर्वैभव मिळेल असे चित्र आहे. हे सुंदर फ्लॉवर पार्क पाहायलाही पर्यटक गर्दी करत आहेत.

बोट क्लबमध्ये गर्दी वाढली

नाशिकजवळील गंगापूर धरणाच्या बॅकवॉटर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे बोट क्लब उभारण्यात आले आहे. या बोट क्लबमध्येही सध्या पर्यटकांची गर्दी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत येत सहा हजार पर्यटकांनी भेट दिली आहे. या क्लबवर वॉटर स्पोर्टस्, फ्लाईंग फिस, व्हर्लपूल राईड, बंपर बनाना राईड, जेट्स स्काय, कयाकिंग, रीगल स्पीड बोट राईड, लेक सफारी लेक, लक्झरिअर क्रुजींग असे वेगवेगळे धाडसी खेळ आहेत. शिवाय सूर्यास्तावेळी स्पेशल सन सेट क्रूज किंवा स्पेशन सन सेट सफारी ही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे.

इतर बातम्याः

Corona vaccination | मुलांच्या लसीकरणाची 1 जानेवारीपासून नोंदणी, असे करा बुकींग…!

विधानसभा अध्यक्ष बदलाची प्रक्रिया घटनाबाह्य, राज्यपालांची हरकत; आता आघाडी सरकार काय निर्णय घेणार?