नाशिकः नाशिकमध्ये (Nashik) शुक्रवारी, 11 फेब्रुवारी रोजी शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा (water supply) बंद राहणार आहे. महापालिकेच्या (Municipal Corporation) पाणीपुरवठा ही विभागाने ही माहिती दिलीय. गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्र आणि नाशिकरोड जलशुद्धीकरण केंद्राच्या वाहिनीवरील व्हॉल दुरुस्तीचे काम आज केले जाणार आहेत. त्यामुळे हा पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आलीय. शिवाय शनिवारी होणारा पाणीपुरवठाही कमी दाबाने होणार आहे. दरम्यान, यापूर्वी पंधरा दिवसांपूर्वीही गंगापूर धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशन व मुकणे धरण रॉ. वॉटर पंपिंग स्टेशनच्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यात आली. मीटरिंग क्बुबिकल, एचटी व एलटी ट्रान्सफॉर्मर यासह विविध उपकरणे बदलण्यात आली. त्यासाठी अनेक भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. आताही ऐन हिवाळ्यात दोन दिवस नाशिककरांना पाणीबाणीला सामोरे जावे लागणार आहे.
कोठे येणार नाही पाणी?
नाशिक पूर्व विभागातील अनेक भागात आज पाणीपुरवठा होणार नाही. त्यात प्रभाग क्रमांक 23 व 30. साईनाथनगर, विनयनगर, अमृतवर्षा कॉलनी, वडाळा रोड, जयदीपनगर, मिल्लतनगर, जेएमसीटी कॉलेज परिसर, रॉयल कॉलनी, रजा कॉलनी, रहनुमानगर, गणेबाबानगर, आदित्यनगर, कल्पतरूनगर, पखालरोड, मातोश्री कॉलनी, ममतानगर, अशोकामार्ग भाग व परिसरात पाणी येणार नाही. नाशिकरोड विभागातील प्रभा क्रमांक 17, 18, 19, 29, 21 मध्ये सकाळी नऊनंतर आणि सायंकाळी पाणीपुरवठा होणार नाही. शिवाय शनिवारी, 12 फेब्रुवारी रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल, असे कळवण्यात आले आहे.
इथली टंचाई मिटणार
नाशिकमध्ये पाण्याची काही कमतरता नाही. यंदा तर पावसाने कहर केला. दिवाळीपर्यंत त्याचे थैमान सुरू असल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. मात्र, इतके असूनही नाशिक-पंचवटीच्या गावठाण भागामध्ये म्हणजेच जुन्या नाशिकमध्ये नेहमी पाणी टंचाई जाणवते. त्याचे कारण म्हणजे इथे चोवीस तास पाणीपुरवठा होत नाही. हे पाहता महापालिका आयुक्त कैलास जाधव सक्रिय झाले आहेत. त्यांनी या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी स्काडाचा प्रयोग राबविण्याची निर्णय घेतल्याचे समजते. या प्रयोगाने गावठाणात पाणी मोजणीचा मार्गही मोकळा होणार आहे.
अचूक पाणी मोजणी
नाशिक-पंचवटी गावठाणात पाणीपुरवठा करण्यासाठी असलेली योजना रद्द करण्यात आली आहे. आता नव्या वर्षात स्काडा पद्धती आणण्यासाठी आयुक्तांनी पावले उचलली आहेत. त्यामुळे धरणातून थेट पाण्याच्या टाकीपर्यंत जाणाऱ्या पाण्याची मोजणी करणे सोपे होणार आहे. खरेतर पाण्याची अचूक मोजणी करण्यासाठी म्हणूनच स्काडा सिस्टीमसाठी दोन वर्षांपूर्वी निविदा काढली. मात्र, त्यातील अटी, शर्थीत अनेक बदल झाले. हे सारे संशयास्पद वाटल्याने त्या निविदा रद्द करण्यात आल्या. आता त्यानंतर पुन्हा एकदा स्काडा सिस्टीम राबवण्यात येणार आहे. त्याचा फायदा नाशिक आणि पंचवटी गावठाणाला होऊन तिथे चोवीस तास पाणी मिळेल.
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?