नाशिक: आज पहाटे खासगी बस (private bus) आणि ट्रॅक्टर दरम्यान झालेला अपघात (accident) अत्यंत भीषण होता. अपघातानंतर बसचं इंजिन फुटलं. त्यामुळे बसने (bus) पेट घेतला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांना काय करावे कळत नव्हते. काहींनी जीव वाचवण्यासाठी उड्या मारल्या. काहीजण जीव वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने ओरडत होते. किंकाळ्या फोडत होते. पण त्यांना बसमधून बाहेर पडता येत नव्हते. काहींनी तर जळालेल्या अवस्थेतच बसमधून उड्या घेतल्या… या अपघातात तब्बल 10 ते 12 जणांचा मृत्यू झाला. या ठिकाणी अपघात स्पॉट आहे. या चौकात स्पीड ब्रेकर असते तर अपघात झालाच नसता, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
औरंगाबाद-नाशिक महामार्गावर नाशिकजवळच्या नांदूरनाका परिसरात खासगी ट्रॅव्हल बस आणि आयशर ट्रकची जोरदार धडक झाली. या धडकेत 10 ते 11 जणांचा मृत्यू झाला. ही बस चिंतामणी ट्रव्हल्सची होती. यवतमाळच्या पुसद येथून ही बस मुंबईला चालली होती. तर ट्रक धुळ्याहून पुण्याकडे जात होता. बसमधून एकूण 48 जण प्रवास करत होते. आज पहाटे 4.45च्या सुमारास हा अपघात झाला.
धुळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या ट्रकने बसला जोरदार धडक दिली. त्यामुळे बसचं इंजिन फुटलं आणि बसने अवघ्या काही क्षणात पेट घेतला. काळोखामुळे काय घडतंय हेच प्रवाशांना कळलं नाही. त्यामुळे प्रवाशांमध्ये घबराट पसरली. जीव वाचवण्यासाठी काही लोक उड्या मारत होते. काही मध्येच अडकले होते. ही घटना खूप डेंजर होती. बसमधून पडण्याचा कोणताही मार्ग नव्हता. त्यामुळे प्रवाशांचा आक्रोश सुरू होता. काहींनी तर जळत असतानाच गाडीतून उड्या मारल्या, असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
औरंगाबाद रोड आणि रिंग रोडचा हा अॅक्सिडंट स्पॉट झाला आहे. या ठिकाणी हेवी ट्रॅफिक असते. त्यामुळे या परिसरात अनेक अपघात होत असतात. या ठिकाणी स्पीड ब्रेकरही नाहीत. स्पीड ब्रेकर असते तर आजचा दिवस उगवलाच नसता, असंही या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.
अपघात पाहताच आम्ही अग्निशमन दल आणि पोलिसांना फोन केले. तसेच या परिसरात शुकशुकाट होता. काही मॉर्निंग वॉकला आलेल्या लोकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केल्याचंही प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे.
1. अमित कुमार – वय 34
2. सचिन जाधव – वय 30
3. आश्विनी जाधव – वय 26
4. अंबादास वाघमारे – वय 43
5. राजू रघुनाथ जाधव – वय 33
6. निलेश प्रेमसिंग राठोड – वय 30
7. भगवान श्रीपत मनोहर – वय 65
8. संतोष राठोड – वय 28
9. हंसराज बागुल – वय 46
10. डॉ. गजकुमार बाबुलाल शहा – वय 79
11. त्रिशिला शहा – वय 75
12. भगवान लक्ष्मण भिसे – वय 55
13. रिहाना पठाण – वय 45
14. ज्ञानदेव राठोड – वय 38
15. निकिता राठोड – वय 35
16. अजय देवगण – वय 33
17. प्रभादेवी जाधव – वय 55
18. गणेश लांडगे – वय 19
19. पूजा गायकवाड – वय 27
20. आर्यन गायकवाड – वय 8
21. इस्माईल शेख – वय 45
22. जयनुबी पठाण – वय 60
23. पायल शिंदे – वय 9
24. चेतन मधुकर
25. महादेव मारुती
26. मालू चव्हाण – वय २२
27. अनिल चव्हाण – वय २८
28. दीपक शेंडे – वय ४०