नाशिक: सटाण्यातील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि मनमाडमधील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत त्यांनी हा पक्ष प्रवेश केला. त्यामुळे भाजपच्या तंबूत खळबळ उडाली आहे.
भुजबळ फार्म येथील कार्यालयात सटाणा येथील भाजप कार्यकर्ते तर मनमाड येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला. यावेळी छगन भुजबळ यांनी या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा पक्षात योग्य तो सन्मान राखला जाईल. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे असलेले प्रश्न शासनाच्या माध्यमातून सोडविण्यास राष्ट्रवादी कटिबद्ध असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले. याबाबतची प्रेस रिलीज भुजबळ यांच्या कार्यालयातून जारी करण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे विचार सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यात येऊन पक्ष संघटना अधिक बळकट करण्यात यावी. ज्या पदाधिकाऱ्यांनी आज पक्षात प्रवेश केला आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सन्मान राखला जाईल. तसेच लोकहिताची सर्व कामे मार्गी लावली जातील, असे आश्वासन भुजबळ यांनी दिले.
यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, राष्ट्रवादीचे माजी आमदार संजय चव्हाण, दीपिका चव्हाण,माजी आमदार संजय पवार, युवक जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष पांडूनाना सोनवणे, नांदगांव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, माजी सरपंच अरुण सोनवणे, माजी सरपंच बाळासाहेब देवरे, अनिल चव्हाण, गणेश पवार, सुयोग अहिरे, परेश देवरे, चेतन देवरे, नाना शिंदे, युवक कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद सोनवणे, योगेश जाधव, अक्षय देशमुख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत चौंधाने, तालूका बागलाण येथील भाजपाचे तालुका उपाध्यक्ष व माजी सरपंच प्रकाश मोरे, वि.का.सोसायटीचे माजी चेअरमन भगवान मोरे, संजय मोरे, संजय शेवाळे, प्रवीण मोरे, मच्छिंद्र मोरे, भगवान मन्साराम मोरे, बाळू मोरे, श्यामकांत मोरे, दत्तू मोरे, मुरलीधर खैरणार, एकनाथ मोरे, रोशनी मोरे, विमलबाई मोरे, दिनेश मोरे, आप्पा पवार, खंडू मोरे, मनोहर मोरे, राहुल वाघ, मोरे नगर, ता.बागलाण येथील भाजपा ओबीसी सेलचे उपाध्यक्ष व माजी सरपंच सुरेश आहिरे, विनोद बोरसे, कमलाकर वाघ, राज वडजे, रवि बोरसे, दादा बोरसे, गुलाम शेख, धनराज वाघ, अजित खैरनार, शंकर देवरे, बापू मोरे, प्रभाकर मोरे, राजेंद्र मोरे यांनी तर मनमाड, ता.नांदगाव येथील युवा सल्लामंच संस्थापक अध्यक्ष शुभम गायकवाड, युवा सल्लामंच शहराध्यक्ष सागर राजगिरे, श्रीराज कातकाडे, राहुल गवळी आदींनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 16 January 2022 pic.twitter.com/QfUyTD1Anh
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 16, 2022
संबंधित बातम्या:
Nashik Corona : नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची 10 हजारांकडे वाटचाल; जाणून घ्या आजची स्थिती
Nashik Vaccination | कोरोना लसीकरण नोंदणीत घोळ, गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत मुजरा; नेमका प्रकार काय?